महागाईत दिलासा! अत्यावश्यक 41 औषधांच्या किमती होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय

महागाईत दिलासा! अत्यावश्यक 41 औषधांच्या किमती होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय

Medicine Price:  देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (National Pharmaceutical Pricing Authority) मोठा निर्णय घेत अत्यावश्यक 41 औषधांच्या किमती (Medicine Price) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या 143 व्या बैठकीत मधुमेह (diabetes), हृदय (heart) आणि यकृताशी (liver) संबंधित औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने फार्मा कंपन्यांना औषधांच्या कमी किमतींची माहिती डीलर्स आणि स्टॉकिस्टना देण्याचे निर्देश दिले आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार आता देशात अँटासिड्स, मल्टीव्हिटामिन्स आणि अँटीबायोटिक्सच्या औषधांसाठी कमी किंमत मोजावी लागणार आहे.

अपचनापासून आराम मिळवण्यासाठी अँटासिड्स औषधे वापरली जातात तर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मल्टीव्हिटामिन्स औषधे वापरली जातात आणि क्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्स औषधेचा वापर करण्यात येतो.

पुणेकरांनो, स्वस्त घर खरीदीचे स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाने केली मोठी घोषणा

आपल्या देशात 10 कोटींहून जास्त मधुमेह रुग्ण आहेत. यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा 10 कोटींहून अधिक मधुमेही रुग्णांना फायदा होणार आहे.

सनी लिओनीचे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील हटके लूक; चाहते झाले घायाळ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज