खरेदी केलेले औषध खरे आहे की बनावट? QR कोड स्कॅन करुन समजणार

खरेदी केलेले औषध खरे आहे की बनावट? QR कोड स्कॅन करुन समजणार

QR Code on Medicines: औषध खरी की खोटी याचं टेन्शन नेहमीच असतं. तुम्ही मेडिकल स्टोअरमधून खरेदी करत असलेले औषध खरे आहे की नाही, आता त्याबाबत टेन्शन घेण्याची गरज नाही. आजपासून तुम्ही QR कोड स्कॅन करून औषध खरी आहे की नाही हे स्वतःच जाणून घेऊ शकता. केंद्र सरकारने आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून 300 औषधांवर क्यूआर कोड टाकण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारने का निर्णय घेतला?
औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 मध्ये सुधारणा करून, सरकारने फार्मा कंपन्यांना त्यांच्या ब्रँडवर H2/QR लावणे अनिवार्य केले आहे. भारताच्या ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने फार्मा कंपन्यांना त्यांच्या औषधांवर बार कोड टाकण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. बनावट औषधांवर कारवाई करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 2022 मध्येच केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करून फार्मा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी आज, 1 ऑगस्टपासून करण्यात आली आहे.

बिहारमध्ये पुन्हा जातनिहाय जनगणना होणार, पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाचा बिहार सरकारला दिलासा

QR कोडमध्ये कोणती माहिती असेल?
बार कोड किंवा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला औषधाबद्दल सर्व काही कळू शकेल. आजपासून तुम्हाला अल्लेग्रा, शेलकल, कॅल्पोल, डोलो आणि मेफ्टल या औषधांवर QR कोड मिळतील. सरकारने या कंपन्यांना त्यांच्या औषधांवर बार कोड लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यास फार्मा कंपन्यांना दंड होऊ शकतो. औषधांवरील या QR कोडद्वारे, लोकांना औषधाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती मिळेल जसे की ओळख कोड, औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँड नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तपशील, परवाना क्रमांक यांचा समावेश असणार आहे.

राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस; बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा…

कोणती औषधे समाविष्ट आहेत?
केंद्र सरकारने प्रमुख 300 औषधांच्या ब्रँडचा समावेश केला आहे. यामध्ये कॅल्पोल, डोलो, सॅरिडॉन, कॉम्बीफ्लॅम आणि अँटीबायोटिक्स अजिथ्रल, ऑगमेंटिन, सेफ्टम, मेफ्टल ते अँटी-अॅलर्जी ड्रग अॅलेग्रा आणि थायरॉइड औषध थायरोनॉर्म यांचा समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube