… मग तेव्हा त्यांना मतचोरी दिसत नाही का?, उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच मतचोरीवर बोलले

… मग तेव्हा त्यांना मतचोरी दिसत नाही का?, उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच मतचोरीवर बोलले

Ajit Pawar On Vote Chori : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून ( Vote Chori) देशभरात एक वातावरण निर्माण केलं आहे. निवडणूक आयोगावरही त्यांनी गंभीर आरोप केलेत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांकडे काही मुद्देच नाहीत. मत चोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

विरोधकांकडं काही मुद्देच नाहीत. मत चोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहेत. मध्यंतरी काँग्रेसकडे काही राज्यांची सत्ता गेली, त्यावेळी मतचोरी, ईव्हीएम त्यांना दिसलं नाही. सत्ता गेली की मग ईव्हीएम आणि मत चोरीचे मुद्दे समोर आणले जातात, यात काहीही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तुमच्यावर कठोर कारवाई होणार, देशाची माफी मागा म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींचा इशारा

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठी बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे, जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, वातावरण शांत राहावं असं प्रत्येक सरकारला वाटत असते. पण, समोरचा व्यक्ती कसा प्रतिसाद देतो, त्यावर हे अवलंबून असतं असंही ते म्हणाले.

याबरोबरच प्रत्येकाची काळजी घेणं हे सरकारचं काम असतं. सरकार म्हणून आम्ही मोर्चाबद्दल चर्चा केलेली आहे, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच, त्यांनी प्रभाग रचनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रभाग रचना मध्ये मायनस आणि प्लस 10 टक्के इकडे-तिकडे होत असतं. माझं स्वतःच वैयक्तिक मत असं आहे, की प्रभाग रचना कशी ही असली तरी जो लोकांची कामं करतो, त्याला याचा फारसा फरक पडत नसतो. मुळातच प्रत्येकाला हवी तशी रचना होत नाही, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या