Dry fruit: मधुमेहाच्या रुग्णांनीही आवश्य सेवन करावे असे 8 प्रकारचे ड्रायफ्रूट्स; न घाबरता आजचं आहारात समाविष्ट करा

Dry fruit: मधुमेहाच्या रुग्णांनीही आवश्य सेवन करावे असे 8 प्रकारचे ड्रायफ्रूट्स; न घाबरता आजचं आहारात समाविष्ट करा

Dry fruit: आजच्या धावपळीच्या जीवनात बदलणारी जीवनशैली आणि दैनंदिन जीवनाच्या पौष्टिक आहारात झालेले बदल यामुळे आपल्याला अनेक समस्यांना आणि आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या आजारांमध्ये मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा, अस्थमा, अर्धांगवायु यांसारख्या आजारांचा समावेश होतो. देशातील मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमुळे भारत हा ‘जगातील मधुमेहाची राजधानी’ म्हणून ओळखली जात आहे. कारण जगातील एकूण मधुमेह रुग्णांपैकी 17% रुग्ण हे एकट्या भारतात आढळतात.

मधुमेह हा एक असाध्य रोग आहे जो औषधांच्या मदतीने आणि जीवनशैलीतील काही बदलांच्या मदतीने नियंत्रित केला जाऊ शकतो. साधारणपणे मधुमेहाच्या रुग्णांना काही ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
मधुमेहाला न घाबरता कोणकोणत्या सुका मेवा पदार्थांचा तुमच्या आहारात तुम्ही समावेश करायला पाहिजे याबद्दलच माहिती देणार हा लेख आवर्जून वाचा.

1. काजू – काजूमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आहेत. काजूच्या सेवनाने रक्तातील शुगर लेवल नियंत्रित राहते.

2. बदाम – बदामचे सेवन केल्याने इन्सुलिनची लेवल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे जेवणानंतर किंवा सकाळी दिवसाच्या सुरुवातीला बदाम खाणं फायदेशीर आहे.

3. पिस्ता – मधुमेहाच्या रुग्णाला वजन राखणं खूप गरजेचं आहे. पिस्त्यामध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. मधुमेह असणाऱ्यांनी पिस्ता खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

काही तासात मजूर झाला करोडपती, 40 रुपये उसने घेऊन केले ‘हे’ काम

4. मनुका – अनेक पोषण तत्त्वांनी युक्त मनुका हा मधुमेहावर स्वस्त उपाय आहे. मनुक्याच सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

5. वाळवलेल्या मनुका – यामध्ये असलेले सोल्युबल फायबर आणि विटामिन सी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे मधुमेहींनी नियमितपणे वाळवलेल्या मनुकांचे सेवन केलं पाहिजे.

6. वाळवलेले जर्दाळू – जर्दाळू हे फ्री रॅडिकल्स पासून पेशींच संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडंट प्रदान करतात. त्यामुळे तुमच्या आहारात वाळवलेल्या जर्दाळूचे सेवन आवश्यक करा.

7. वाळवलेले काळे अंजीर – यामध्ये विटामिन बी 6, मॅग्नेशियम आणि लोह जास्त प्रमाणात आहे. सोबतच यात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता आणि सूज या दोन्ही पासून आराम मिळतो.

8. वाळलेल्या मलबेरी – तुती यात साखरेचे प्रमाण कमी असते आणि मॅग्नेशियम, विटामिन बी, लोह, पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे वाळवलेल्या मलबेरी या मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube