काही तासात मजूर झाला करोडपती, 40 रुपये उसने घेऊन केले ‘हे’ काम

काही तासात मजूर झाला करोडपती, 40 रुपये उसने घेऊन केले ‘हे’ काम

West Bengal News : पश्चिम बंगालच्या (West Bengal) पूर्व बर्दवानमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. जिथे एक रोजंदारी करणारा मजूर काही तासात करोडपती झाला. हा मजूर शेळ्यांसाठी गवत कापण्यासाठी गेला होता आणि घरी परतल्यावर त्याला कळले की तो आता करोडपती (lottery) झाला आहे. ही बातमी गावात पसरताच जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आणि लोक त्यांचे अभिनंदन करण्यासाठी येऊ लागले.

जिल्ह्यातील मंगळकोटमधील खुर्तुबापूर गावात ही घटना घडली. येथे राहणारे भास्कर माळी हे इतरांच्या शेतात मजुरी करून शेळ्या पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या दहा वर्षांपासून ते लॉटरीची तिकिटे खरेदी करत होते. एक दिवस त्यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल या आशेने रविवारी सकाळी त्यांनी 40 रुपये उसने घेऊन लॉटरीचे तिकीट घेतले आणि दुपारी करोडपती झाले.

मजुराला लॉटरीत 1 कोटी रुपयांचे बक्षीस
मजूर भास्कर माळी यांनी सांगितले की, रविवारी ते नापारा बसस्थानकावर शेळ्यांसाठी गवत कापण्यासाठी आले होते. पण लॉटरीचे तिकीट घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून 40 रुपये उसने घेतले, त्यानंतर लॉटरी काउंटरवरून तिकीट क्रमांक 95H83529 हे 60 रुपयांना विकत घेतले आणि घरचे काम करू लागले. दुपारी त्यांना लॉटरीत पहिले बक्षीस मिळाल्याचे समजले. हे कळल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातिनिहाय जनगणना? बावनकुळेंनी सांगितलं…

लॉटरीचे तिकीट विक्रेत्यांनी सांगितले की, रविवारी दुपारी 1.20 वाजता त्यांना कळले की गावातील भास्कर माळी याने 1 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते परिसरात लॉटरी काउंटर लावत आहेत. एक गरीब मजूर त्यांच्या दुकानातून खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकिटाने करोडपती झाला यांचा त्यांना आनंद आहे.

हाफकिनकडून खरेदी बंद; रुग्णांसाठी औषधांचा आभाव : 24 जणांच्या मृत्यूनंतर अधिष्ठात्यांची संतापजनक माहिती

मुलींच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडणार
1 कोटींची लॉटरी जिंकलेले भास्कर माळी म्हणाले की, त्यांचे घर मातीचे आहे. पावसाळ्यात पाणी गळते. या पैशातून आम्ही घर बांधू आणि आमच्या मुलींच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडू. शेतीसाठी काही जमीनही खरेदी करणार आहे. त्यांच्या मुलींनी सांगितले की, वडिलांनी मोठ्या कष्टाने आम्हाला बीए पास केले आणि कर्ज काढून आमच्या दोन्ही बहिणींचे लग्न केले. आता देवाने त्यांच्यावर कृपा केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube