हाफकिनकडून खरेदी बंद; रुग्णांसाठी औषधांचा आभाव : 24 जणांच्या मृत्यूनंतर अधिष्ठात्यांची संतापजनक माहिती
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Shankarao Chavan Government Medical College) मागच्या 24 तासांत तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. मृतांपैकी काही सर्पदंशाच्या उपचारासाठी दाखल झाली होते तर बालके इतर कारणांमुळे रुग्णालयात उपचार घेत होते. (Nanded government hospital din informed that there is a huge shortage of medicines for the patients after purchase of medicines stopped from Hafkin)
या गंभीर घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी आरोग्य आयुक्त आणि संचालक यांना तातडीने नांदेडला रवाना होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. स्वतः हसन मुश्रीफही उद्या मंत्रिमंडळ बैठक घेऊन नांदेडला रवाना होणार असल्याची माहिती आहे. जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे आश्वासनही मुश्रीफ यांनी दिले आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव; 24 तासात तब्बल 24 बालकांचा मृत्यू
हाफकिनकडून खरेदी बंद; रुग्णांसाठी औषधांचा आभाव :
दरम्यान, या घटनेबाबत बोलताना रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी औषधांचा प्रचंड तुटवडा असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. हाफकिनकडून औषधांची खरेदी बंद केली आहे. काही काळात हाफकिनकडून औषधांची खरेदी होणार होती, ती झालेली नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नाही. औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडते अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“त्या’ सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा” : देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?
वाकोडे पुढे म्हणाले, नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 70 ते 80 किमी परिसरातील रुग्ण दाखल होत असतात. आता मृत्यू झालेल्यांमधील बरेच जण ग्रामीण भागातील विविध शासकीय ग्रामीण रुग्णालयातून अतिशय अत्यावस्थ परिस्थितीत या महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करुन देखील त्यांना वाचवण्यात अपयश आले. मात्र अत्यवस्थ रुग्ण आणि लहान मुलांचा औषधाअभावी मृत्यू होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले.