नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव; 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा समावेश

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव; 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा समावेश

नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Shankarao Chavan Government Medical College) मृत्यूचे तांडव पाहायाला मिळत आहे. मागच्या 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. मृतांपैकी काही सर्पदंशाच्या उपचारासाठी दाखल झाली होते तर बालके इतर कारणांमुळे रुग्णालयात उपचार घेत होते. (24 children died in Shankarao Chavan Government Medical College Hospital within 24 hours)

या रुग्णांना वेळेत उपचार होऊ शकल्याने आणि औषध वेळेत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. हाफकीनकडून औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे, असा आरोप होतं आहे. ठाण्यातील घटनेला अद्याप महिनाही उलटला नसताना नांदेडमध्येही पुन्हा तसाच प्रकार घडल्याने आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

“त्या’ सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा” : देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?

यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील विविध शासकीय ग्रामीण रुग्णालयातून अतिशय अत्यावस्थ परिस्थितीत ही बालके या महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करुन देखील त्यांना वाचवण्यात अपयश आले. दरम्यान, घटनेचं वृत्त कळताच नांदेडचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Prakash Ambedkar : ‘ती’ वेळ आणू नका… भाजपची ‘बी टीम’ म्हणणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आंबेडकरांचा इशारा

ठाण्यात काय घडलं होतं?

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसांत 27 जणांचा मृत्यू झाला होता. उपाचारांआभावी आणि सुविधांआभावी हे मृत्यू झाल्याचे आरोप नातेवाईकांनी आणि विरोधकांनी केले होते. त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंना विरोधकांनी त्यांना घेरले होते. त्यावेळी उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण अत्यावस्थ किंवा वृद्ध होते, त्यामुळे ते उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नव्हते, असा दावा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube