कोरोना व्हायरस चिनी प्रयोगशाळेतूनच लीक, CIA ने केला मोठा दावा

  • Written By: Published:
कोरोना व्हायरस चिनी प्रयोगशाळेतूनच लीक, CIA ने केला मोठा दावा

Donald Trump : कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून तो चिनी प्रयोगशाळेतून उद्भवला असल्याचा मोठा दावा अमेरिकेची (America) गुप्तचर संस्था सीआयएने (CIA) केला आहे. त्यामुळे या व्हायरसबाबत पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच सीआयएने कोरोना व्हायरसबाबत (Corona Virus) मोठा दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प देखील आपल्या पहिल्या कार्यकाळात कोरोनाव्हायरसला ‘चिनी व्हायरस’ म्हणत शी जिनपिंग सरकारवर (Xi Jinping government) टीका करत होते. तर दुसरीकडे चीनने या अहवाला राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

सीआयएने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कोविड-19 व्हायरस निसर्गातून नव्हे तर प्रयोगशाळेत निर्माण झाला आहे. मात्र सीआयएने या दाव्यावर आतापर्यंत कोणतेही पुरावे दिलेले नाही. माहितीनुसार, बायडेन सरकार आणि सीआयएचे माजी संचालक विल्यम बर्न्स यांच्या विनंतीवरून हा अहवाल तयार करण्यात आला होता तर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ (John Ratcliffe) यांच्या विनंतीवरून शनिवारी अहवाल सार्वजनिक करण्यात आले आहे.

सीआयएने असा दावा केला आहे की, कोरोनाव्हायरस उद्भवण्याची शक्यता नैसर्गिक नाही तर तो जाणीवपूर्वक प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे यापूर्वी सादर करण्यात आलेल्या अहवालात सीआयएने हा व्हायरस चीनमधील प्रयोगशाळेतून चुकून बाहेर पडला किंवा नैसर्गिकरित्या उदयास आला असा दावा केला होता. चिनी अधिकाऱ्यांकडून सहकार्याचा अभाव असल्याने या प्रश्नांची उत्तरे कधीच पूर्णपणे मिळणार नाहीत असं सीआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘बुढ्ढे ड्युटी करनी आती क्या?, 2 तासांत सस्पेंड करतो’, पोलिसांना धमकी देणाऱ्या बाकलीवालला मोठा दणका

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रसार अमेरिकेत झाला होता. अमेरिकेत या व्हायरसमुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले होते. परिस्थिती इतकी भयंकर होती की दररोज 2000 पेक्षा जास्त लोक अमेरिकेत आपले प्राण गमावत होते. कोरोना व्हायरसवरून आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले होते तसेच अनेकदा त्यांनी या व्हायरसला चिनी व्हायरस म्हणून देखील उल्लेख केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube