‘बुढ्ढे ड्युटी करनी आती क्या?, 2 तासांत सस्पेंड करतो’, पोलिसांना धमकी देणाऱ्या बाकलीवालला मोठा दणका

  • Written By: Published:
‘बुढ्ढे ड्युटी करनी आती क्या?, 2 तासांत सस्पेंड करतो’, पोलिसांना धमकी देणाऱ्या बाकलीवालला मोठा दणका

Chhatrapati Sambhajinagar : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडिओ पाहून सर्वांना धक्का बसतो असाच एक व्हिडिओ संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक कार चालक वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन धमकवत आहे. व्हिडिओमध्ये पोलिसांना धमकी देणाऱ्याचा नाव कुणाल बाकलीवाल (Kunal Bakliwal) आहे.

या व्हिडिओमध्ये कुणाल बाकलीवाल ‘तू मेरे को पहचानता है क्या?, बुढ्ढे तेरे को ड्युटी करनी आती क्या?’ असं म्हणत पोलिसांना शिवीगाळ करताना दिसत आहे. तसेच पोलिसांना सस्पेंड करण्याचीही धमकी देताना दिसत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कुणाल संभाजीनगरमधील एक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक असून त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी ओळख आहे.

तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या आणि धमकवणाऱ्या कुणाल बाकलीवाल विरोधात पुढील कारवाई सुरु केली आहे. त्याच्या विरोधात मोटर वेहिकल कायद्याअंतर्गत आणि शासकीय कामात अडथळा आणणे या कलमांतर्गत क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच बरोबर पोलिसांनी कुणालची गाडी देखील ताब्यात घेतली आहे.

नेमकं घडलं काय?

सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत डिफेंडर गाडीतून जाणाऱ्या कुणाल बाकलिवालला पोलिसांनी अडवून त्याला खाली उतरण्यास संगितले होते मात्र कुणालने एका बड्या व्यक्तीला फोन लावून पोलिसांना दिला आणि गप्प बस, माझ्या नादी लागू नको… पोलीस असाल तर काय माझे बाप झालात की देव झालात. अशी भाषा पोलिसांना वापरली तसेच तू मेरे को पहचानता है क्या?, बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या? तुम्हाला दोन तासांत तुम्हाला सस्पेंड करतो. अशी धमकी देखील त्याने पोलिसांना दिली. तसेच जनतेच्या पैशातून पगार मिळतो, पण तुम्ही जनतेलाच वागवता का? असं देखील व्हिडिओमध्ये तो सांगताना दिसत आहे. माहितीनुसार, पोलिसांनी कुणाल बाकलीवाल ताब्यात घेतले असून या प्रकरणात पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.

सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवीन ट्विस्ट, पोलिसांनी चुकीचा आरोपी पकडला? फिंगरप्रिंटबाबत धक्कादायक खुलासा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube