टेन्शन वाढलं! भारतात कोरोना पुन्हा येणार… आरोग्य तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती

Corona Virus Latest Update : जगभरात 2019 मध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा (Corona) प्रादुर्भाव वेळोवेळी वाढतच आहे. कोविड साथीच्या दोन वर्षे जगात कहर केला होता. आजही जेव्हा कोरोनाचे नाव येते, तेव्हा लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या जीवनाचे आणि ऑक्सिजन सिलिंडरसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांचे दृश्य आठवते. परंतु आता पुन्हा एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुन्हा काही देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू (Covid Cases) लागले आहेत.
भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे पुन्हा हळूहळू वाढू लागली आहेत. सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, 12 मे पासून अपडेट केलेल्या डॅशबोर्डवर एकूण 257 सक्रिय रूग्ण दिसून येत आहेत. यापैकी बहुतेक प्रकरणे केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातून नोंदवली गेली (Health Update) आहेत. याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी मोठी माहिती दिली आहे.
सिंगापूरमध्ये कोरोनाचे नव्याने रुग्ण आढळल्यामुळे भारतात देखील मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.आरोग्य तज्ज्ञ भोंडवे यांनी टीव्हीनाईन मराठीसोबत बोलताना महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे भारतात चिंता करण्याचं काहीचं कारण नाही. भारतामध्ये सर्व पातळीवर हा विषाणू पसरणार नाही. कोरोनाचे नवे व्हेरियंट जास्त मारक नाही. मागील चार वर्षात देखील कोरोना संपला, असं जाहीर झाल्यानंतर एखादा-दुसरा रूग्ण देशात सापडतच होता. त्यामुळे कोरोनाचा आता भारतात थोड्या-फार प्रमाणात शिरकाव होऊ शकतो, परंतु लाट येईल असं काही वाटत नाही.
बीड जिल्ह्याची ‘ती’ ओळख होऊ देणार नाही; गेवराईत अजित पवारांकडून ‘जातीय’ वादावर भाष्य
संशोधकांना हा विषाणू प्राण्यांमध्ये देखील सापडला आहे. कोरोनाचा विषाणू नवा असो किंवा जुना, उपाय तेच असल्याचं भोंडवे म्हणाले आहेत. कोरोना पुन्हा येऊ शकतो, परंतु घाबरू जाऊ नका. काळजी घ्या असं भोंडवे यांनी म्हटलंय. हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या शहरांमध्ये विषाणूच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आरोग्य अधिकाऱ्यांनी परिस्थितीबाबत अलर्ट जारी केला आहे.
चीनमध्येही कोविडचे रुग्ण वाढत आहेत. 4 मे पर्यंतच्या पाच आठवड्यात तेथील चाचणी पॉझिटिव्हिटी दर दुप्पट झाला आहे. थायलंडमध्येही एप्रिलमध्ये साजरा होणाऱ्या ‘सोंगक्रान’ उत्सवानंतर कोविड-19 च्या घटनांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे, कारण या काळात खूप गर्दी असते.