डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय, नवीन नाही जुन्याच गोष्टी.. अमलात आणा अन् राहा कूल

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय, नवीन नाही जुन्याच गोष्टी.. अमलात आणा अन् राहा कूल

Digital Detox : इंटरनेट मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इंटरनेट या तीन गोष्टी नाहीत म्हटल्यानंतर काम ठप्प होणारच अशी आजची परिस्थिती आहे. सकाळी उठल्यापासून रात्री अंथरुणावर पडेपर्यंत हातातला मोबाईल सुटत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की ही सवय तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करत आहे. डिजिटल डिटॉक्स हा शब्द (Digital Detox) आज सातत्याने कानावर पडत आहे. त्याचा याच्याशी काही संबंध आहे का, डिजिटल डिटॉक्सला आपल्या लाईफस्टाईलचा घटक बनवून आरोग्य नैसर्गिकपणे स्वस्थ करता येऊ शकते का.. याची माहिती घेऊ या

डिजिटल डेटॉक्समध्ये काही वेळ का होईना पण लॅपटॉप आणि मोबाईल दूर ठेवल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे एका निश्चित वेळीच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करा. जेणेकरून आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय

डिजिटल डिटॉक्सचा अर्थ असा नाही की तुम्ही फोनचा वापर कायमस्वरूपी बंद करा. असे केले तर तुमची महत्त्वाची सर्व कामे अडकून पडतील. याचा अर्थ असा की तुम्ही दिवसातील 24 तासांपैकी काही वेळ लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर करू नये. ज्यावेळी खूप गरज असेल अशाच वेळी या उपकरणांचा वापर करा. बाकीच्या वेळी तुमचा फोन किंवा लॅपटॉप स्विच ऑफ करून थोडा वेळ एकट्याने किंवा कुटुंबासोबत घालवा. असे केल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. मेंदू देखील वेगाने कार्य करू लागतो.

पाच वर्षात कोरोनाचे व्हेरिएंट बदलले मग, व्हॅक्सिनपण बदलली का?; येल विद्यापीठाचं रिसर्च काय सांगतं?

डिजिटल डिटॉक्सचे फायदे काय

मानसिक आरोग्य राहते उत्तम

मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी चांगली झोप गरजेची आहे. जर तुम्ही दिवसभर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करत असाल तर त्याचा पहिला दुष्परिणाम झोपेवर होतो. तुम्हाला चांगली झोप येत नाही. त्यामुळे भविष्यात डिप्रेशन, इंग्जायटी यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी फोन, लॅपटॉप आणि टिव्ही यांपासून दूर राहा.

शरीराला मिळते एनर्जी

आज आपण डिजिटल उपकरणांवर इतके अवलंबून राहू लागलो आहोत ज्यामुळे आपली सोशल लाईफ पूर्ण हरवून गेली आहे. परिवार आणि मित्रांसोबत वेळ द्यायचा असतो तेव्हा सुद्धा बहुतांश लोक मोबाईल किंवा लॅपटॉप वर काहीनाकाही करत असतात. अशा वेळी जर तुम्ही डिजिटल डिटॉक्सचा अवलंब केला तर शरीरातील ऊर्जा अबाधित राहते. तुम्ही मित्र, नातेवाईक आणि कुटुंबियांना वेळ देऊ शकता.

फोकस वाढण्यास मदत

मोबाईलची सवय कोणत्याही वयोगटासाठी नुकसानकारक आहे. अशा वेळी डिजिटल डिटॉक्सला फॉलो केल्याने मोबाईलची सवय नक्कीच कमी होईल. स्क्रीन टाइम कमी होतो तसेच तुम्ही दुसऱ्या कामांवरही फोकस करू शकता.

स्मरणशक्ती आणखी तल्लख होते

जर तुम्ही दिवसभर टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या उपकरणांचा वापर केला नाही. काही वेळासाठीच जर या वस्तूंचा वापर केला तर यामुळे तुमचे मन मजबूत होते. तसेच तुमची स्मरणशक्ती आणखी तल्लख होते.

सिकल सेल ॲनिमिया 22 वर्षांत होणार हद्दपार, केंद्र सरकारची घोषणा; जाणून घ्या, आजाराचं गांभीर्य..

स्वतःसाठी मिळतो वेळ

डिजिटल डिटॉक्सच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकता. मोबाईल सोडला तर दुसरेही जग आहे याची जाणीव होते. ज्यावेळी तुम्ही काही वेळ स्वतःसाठी देता त्यावेळी स्वतःमध्ये काय उणिवा आहेत याची माहिती होते. तसेच स्वतःला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube