सिकल सेल ॲनिमिया 22 वर्षांत होणार हद्दपार, केंद्र सरकारची घोषणा; जाणून घ्या, आजाराचं गांभीर्य..

सिकल सेल ॲनिमिया 22 वर्षांत होणार हद्दपार, केंद्र सरकारची घोषणा; जाणून घ्या, आजाराचं गांभीर्य..

Sickle Cell Anemia : सिकल सेल ॲनिमिया एक असा जेनेटिक रक्त विकार (Sickle Cell Anemia) आहे ज्यात मानवी शरीरातील लाल रक्त पेशी (Red Blood Cells) प्रभावित होतात. आता या आजारावर सरकारने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र सरकारने सन 2047 पर्यंत या आजाराचे देशातून समूळ उच्चाटन करण्याची घोषणा केली आहे. पण हा आजार नेमका आहे तरी काय? या आजाराला इतके गंभीर का मानले जाते? याची माहिती घेऊ या..

सिकल सेल ॲनिमिया काय?

शरीरात लाल रक्तपेशी गोल आणि लवचिक असतात. यामुळे शरीरात ऑक्सिजन अगदी सहज पोहोचतो. परंतु या आजारात या रक्त पेशी चंद्राच्या आकाराच्या होतात. या कठोर आणि चिकट पेशी रक्त वाहिन्यांमध्ये अडकून बसतात. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होत नाही. रुग्णाला प्रचंड वेदना, थकवा आणि शरीराच्या अनेक अवयवांना नुकसान होते. भारतात ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांत या आजाराचा प्रकोप दिसून येतो.

सिकल सेल ॲनिमिया इतका गंभीर का?

सिकल सेल ॲनिमिया काही साधा आजार नाही. या आजारामुळे रुग्णाचे सर्व जीवनच प्रभावित होते. यामुळे शरीरात अनेक गंभीर व्याधी निर्माण होतात. या आजाराचे लक्षण सर्वसाधारण जीवनाला प्रभावित करतात. या आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत जाणून घेऊ..

तुम्ही दररोज 2 तासांपेक्षा जास्त वेळ गाडी चालवता? ‘हा’ गंभीर आजार होण्याची दाट शक्यता

रक्त वाहिन्यांमध्ये पेशी अडकून बसल्याने छाती, पोट आणि सांध्यात तीव्र वेदना होतात. या वेदना काही तास किंवा काही वेळेस काही दिवस कायम राहू शकतात.

लाल रक्तपेशी लवकर म्हणजे साधारण 10 ते 20 दिवसांत नष्ट होतात. यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता आणि थकवा जाणवतो. व्यक्ती ॲनिमियाचा बळी ठरू शकतो.

सिकल पेशी शरीरात असलेल्या प्लीहा (स्प्लीन) या लहान अवयवाला नुकसान करतात. यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि संसर्गाचा धोका वाढतो.

या आजारामुळे लहान मुलांमध्ये शारीरिक वाढ आणि युवावस्था येण्यात उशीर लागू शकतो. या आजारात फुप्फुसे, हृदय, डोळे, हाडे या अवयवांचे मोठे नुकसान होते. यामुळे रुग्णाचे आयुष्यमान देखील कमी होते.

भारतात या आजाराचे प्रमाण जास्त आहे. 0 ते 40 वयोगटातील सात कोटी लोक या आजाराने ग्रस्त होऊ शकतात किंवा याचे वाहक होऊ शकतात असा अंदाज आहे. जर दोन वाहक विवाह करतात तर त्यांच्यापासून जन्माला येणाऱ्या मुलांना हा आजार होण्याची 25 टक्के शक्यता असते. सन 2047 पर्यंत केंद्र सरकारने या आजाराचा नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत 2026 पर्यंत 0 ते 40 वयोगटातील सात कोटी लोकांची तपासणी केली जाणार आहे.

सोशल स्टिग्मासाठी ICMR ची नवी टर्म

भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने अलीकडेच सिकल सेल ॲनिमियासाठी भारतात पहिल्यांदा ICMR-SCD Stigma Scale नामक एक संज्ञा सादर केली आहे. याला 24 मे रोजी लाँच करण्यात आले होते. हे मोजमाप देशात आजाराचा प्रभाव समजून घेण्यासाठी मदत करेल. याशिवाय या आजाराचे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी ICMR ने काही मानक निश्चित केले आहेत. जसे की हाय परफॉर्मन्स लिक्वीड क्रोमॅटोग्राफीच्या माध्यमातून या आजाराचे अचूक निदान केले जाईल. नवजात अर्भक स्क्रिनिंग AIIMS भोपाळमध्ये विशेष प्रयोगशाळेच्या माध्यमातून होईल तसेच जेनेटिक काउन्सिलिंग सुद्धा होईल.

मेंदूचा ‘हा’ आजार ओळखणं आता आणखी सोपं; नव्या अभ्यासातून मोठा खुलासा..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube