तुम्ही दररोज 2 तासांपेक्षा जास्त वेळ गाडी चालवता? ‘हा’ गंभीर आजार होण्याची दाट शक्यता

Patellar Tendinopathy Symptoms Treatment : तुम्हाला पण गाडी चालवायला (Drive) खूप आवडते का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ गाडी चालवली, तर तुम्हाला सुद्धा पॅटेलर टेंडिनोपॅथीचा त्रास होऊ (Health Tips) शकतो. हा आजार नेमका काय आहे? याची लक्षणे काय आहेत, या आजारापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायची, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.
पॅटेलर टेंडिनोपॅथी ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये गुडघ्याच्या टोपीला हाडाशी जोडणारा पॅटेलर टेंडन सूजतो, वेदनादायक होतो किंवा त्याची झीज होते. हे टेंडन गुडघ्याच्या सांध्याला स्थिर करण्यात आणि (Patellar Tendinopathy) चालणे, धावणे किंवा पायऱ्या चढणे यासारख्या पायांच्या हालचालींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
मोठी बातमी! दहा दिवस आधीच मान्सूनची महाराष्ट्रात वर्दी, हवामान विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना
खरं तर मॅन्युअल कार चालवताना क्लच, ब्रेक आणि एक्सीलरेटर वारंवार दाबल्याने ही समस्या लवकर उद्भवते. ही स्थिती सामान्यतः खेळाडूंमध्ये विशेषतः धावपटू आणि उडी मारणाऱ्यांमध्ये दिसून येते. परंतु, आता ही समस्या ड्रायव्हर्समध्येही वाढत आहे.
जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जे ड्रायव्हर्स दिवसातून 2 तासांपेक्षा जास्त वेळ मॅन्युअल कार चालवतात. त्यांना पॅटेलर टेंडिनोपॅथीचा धोका 2.5 पट जास्त असतो. हा अभ्यास 1200 चालकांवर करण्यात आला, त्यापैकी 65% चालकांनी गुडघेदुखीची तक्रार केली. त्याच वेळी 40% मध्ये पॅटेलर टेंडिनोपॅथीची लक्षणे आढळून आली.मॅन्युअल कारमध्ये क्लच, ब्रेक आणि एक्सीलरेटर वारंवार वापरावे लागतात, ज्यामुळे गुडघ्यांवर वारंवार ताण येतो. विशेषतः क्लच दाबण्यासाठी पाय वारंवार वर-खाली केल्याने, पॅटेलर टेंडनवर दबाव वाढतो.
Video: भुजबळांना मंत्री का केलं?, मुख्यमंत्री फडणवीसांचा काय आहे डाव? जरांगे पाटलांनी सगळच सांगितलं
चुकीची गाडी चालवण्याची स्थिती, जसं की सीट खूप खाली किंवा खूप उंच असणे. यामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. संशोधनात असंही आढळून आलंय की, ऑटोमॅटिक कार चालवणाऱ्यांमध्ये हा धोका तुलनेने कमी होता, कारण त्यामध्ये क्लचचा वापर केला जात नाही. पटेलर टेंडिनोपॅथी हा जीवघेणा आजार नाही, परंतु तो जीवनावर गंभीर परिणाम करू शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात यामुळे फक्त सौम्य वेदना आणि अस्वस्थता येते, परंतु 20 टक्के रुग्णांमध्ये ही स्थिती इतकी गंभीर होते की, ते चालणे किंवा पायऱ्या चढणे यासारख्या दैनंदिन क्रिया करू शकत नाहीत.