मोठी बातमी! दहा दिवस आधीच मान्सूनची महाराष्ट्रात वर्दी, हवामान विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना

Monsoon Reaches Maharashtra Heavy Rain Alert : केरळनंतर नैऋत्य मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात पोहोचला आहे. प्रादेशिक हवामान केंद्रातील शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 25 मे रोजी मान्सून हा तळकोकणातील देवगडपर्यंत दाखल झालेला आहे. महाराष्ट्र-गोव्यामध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण जी सरासरी तारीख (Rain Alert) आहे, ती 5 जून आहे. याच्या दहा दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये हवामान (Weather Update) अनुकूल आहे. त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या विभागांमध्ये मुंबईत दाखल होण्याची शक्यता होती.
2009 नंतर पहिल्यांदाच मान्सून महाराष्ट्रामध्ये इतक्या (Maharashtra Rain) लवकर दाखल झालाय. केरळमध्ये 2011 साली 29 मे रोजी तर महाराष्ट्रात 4 जून,2012 साली केरळमध्ये 05 जून तर महाराष्ट्रात सहा जून रोजी मान्सून महाराष्ट्रात धडकला होता. हवामान विभागाने समुद्रकिनारी धोक्याचा इशारा दिला आहे.
‘मी गेलेल्या एका लग्नात नवरीच पळून गेली…’ सुजय विखेंनी केली अजित पवारांची पाठराखण
भारतीय हवामान खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार मान्सून आज अरबी समुद्र, कर्नाटक, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर बंगालचा उपसागर आणि मिझोरम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पोहोचला आहे. मान्सूनची उत्तरेकडील मर्यादा देवगड, बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, आयझॉल, कोहिमा या भागातून जाते.
Video: भुजबळांना मंत्री का केलं?, मुख्यमंत्री फडणवीसांचा काय आहे डाव? जरांगे पाटलांनी सगळच सांगितलं
आयएमडीने म्हटलंय की, ‘मध्य अरबी समुद्राच्या काही भागात आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्याचप्रमाणे, कर्नाटकातील परिस्थिती, बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागरातील काही भाग देखील मान्सूननुसार आहेत. पुढील तीन दिवसांत ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात मान्सूनच्या आणखी प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारी भाग आणि मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.