Maharashtra Rain Alert : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज
Weather update : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास अडखळला असतानाच, राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (दि. ता. ३०) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २४) राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतला. त्यानंतर मात्र मॉन्सून परतीची वाटचाल ‘जैसे थे’ आहे. नैॡत्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर, तसंच दक्षिण गुजरात आणि परिसरावर चक्राकार वारं वाहत आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. काल रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सामना सुरु झाला तरी टीम इंडियाला नुकसान; चौथ्या दिवशी कानपूरमध्ये कसं असेल हवामान?
आज (ता. ३०) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. सातारा, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, विजांसह वादळी पावसाचा सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, बीड, धाराशिव, लातूर. इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे.