मेंदूचा ‘हा’ आजार ओळखणं आता आणखी सोपं; नव्या अभ्यासातून मोठा खुलासा..

मेंदूचा ‘हा’ आजार ओळखणं आता आणखी सोपं; नव्या अभ्यासातून मोठा खुलासा..

Alzheimer Disease New Study : डीमेंशिया एक गंभीर आणि कॉमन (Dementia) आजार झाला आहे. या आजारात माणसाचा मेंदू प्रभावित होतो. ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये माणसाची विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते. जगात आजमितीस जगात 55 मिलियन पेक्षा जास्त लोक डिमेन्शियाने ग्रस्त आहेत. तसेच दरवर्षी एक कोटी नवे रुग्ण आढळून येत आहेत. डीमेंशिया अनेक प्रकारचा असू शकतो. यामध्ये अल्झायमर (Alzheimer) सर्वात कॉमन आणि गंभीर आजार आहे. हा आजार हळूहळू मेंदूतील कोशिका नष्ट करून टाकतो. यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते.

काय आहे अल्झायमर?

अल्झायमर एक प्रोग्रेसिव आजार आहे. म्हणजेच हा आजार हळूहळू वाढत जाणारा आहे. यामध्ये मेंदूतील पेशी आणि त्यांच्या आपसातील वीण नाहीशी होते. यामुळे स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, सामान्य जीवन जगण्याची योग्यता यांवर परिणाम होतो. विसरण्याची सवय, भ्रमाची स्थिती, सामान्य कामे करताना अडचणी हे या आजाराचे मुख्य लक्षणे आहेत.

उपचार नाही पण अटकाव शक्य

या आजारावर पूर्ण उपचार अजून सापडलेला नाही. पण याची सुरुवातीची लक्षणे वेळेवर लक्षात आली तर या आजाराला वाढण्यापासून अटकाव करता येतो. किंवा या आजाराचा वेग कमी करता येऊ शकतो. यासाठी सुरुवातीचे संकेत ओळखता आले पाहिजेत आणि वेळेवर उपचार सुरू झाले पाहिजेत.

नव्या अभ्यासात काय

Current Biology नावाच्या एका पत्रिकेत एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. यामध्ये अल्झायमरच्या सुरुवातीच्या लक्षणांच्या बाबतीत नवी माहिती देण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांनी वर्चुअल रिॲलिटीच्या मदतीने दिशा ओळखण्यात येणाऱ्या अडचणी अल्झायमरच्या निदान करण्यात मदत करू शकतात का याचा अभ्यास केला.

सावधान! जंक फूडचा मेंदूला गंभीर धोका, ‘या’ समस्या निर्माण होण्याची शक्यता

रिसर्च कसा केला

या अभ्यासात तीन गटांना सहभागी केले होते. 31 युवा व्यक्ती, 36 वयस्कर पण निरोगी व्यक्ती आणि 43 हलक्या स्वरूपात मेमरी लॉस पीडित रुग्ण यांचा समावेश करण्यात आला. सर्व सहभागींना वर्चुअल रिॲलिटी हेडसेट घालून एका रस्त्याने जाण्यास सांगितले गेले. या मार्गावर त्यांना वळण घेऊन एक चक्कर पूर्ण करायचा होता आणि पुन्हा मूळ जागी यायचे होते.

हा रस्ता नंबर असणाऱ्या कोपऱ्यांपासून तयार करण्यात आला होता. यामध्ये दोन सरळ रस्ते आणि मध्ये एक वळण होते. सहभागींना कोणत्याही मार्गदर्शनशिवाय रस्ता पूर्ण करायचा होता. ही प्रक्रिया तीन वेगवेगळ्या परिस्थितीत अमलात आणण्यात आली.

रिसर्चचे परिणाम काय

रिसर्चमध्ये दिसून आले की ज्या लोकांना अल्झायमरची सुरुवात झाली होती ते लोक मार्ग निश्चित करताना वळणाची दिशा आणि कोपऱ्यांचा चुकीचा अंदाज बांधत होते. सामान्य लोकांच्या तुलनेत दिशेच्या बाबतीत जास्त गोंधळात होते आणि त्यांचे निर्णय सुद्धा असंगत होते. यावरून स्पष्ट झाले की ही समस्या फक्त वाढणाऱ्या वयामुळे नाही तर अल्झायमरमुळे सुद्धा निर्माण होते.

तज्ज्ञांचे म्हणणे काय

तज्ञांचे म्हणणे आहे की दिशा ओळखण्यात अडचणी अल्झायमरचे खास आणि सुरुवातीचे लक्षण असू शकते. अल्झायमर रिसर्च युकेच्या डॉक्टरांनी सांगितले की युकेमध्ये जवळपास दहा लाख लोक अल्झायमरने ग्रस्त आहेत. पण 60 टक्के लोकांतील आजाराची ओळख होऊ शकते. अशात वर्चुअल रिॲलिटी टेस्ट अल्झायमरचे सुरुवातीचे लक्षणे ओळखण्यास मदतगार ठरू शकते. याबरोबरच त्यांनी असेही सांगितले की या अभ्यासात सहभागी लोकांची संख्या 50 पेक्षा कमी होती. त्यामुळे भविष्यात याबाबतीत मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्याची गरज आहे.

प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ ठेवणे अन् खाणे धोकादायकच; ‘या’ आजारांना मिळते आमंत्रण..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube