सावधान! जंक फूडचा मेंदूला गंभीर धोका, ‘या’ समस्या निर्माण होण्याची शक्यता

Junk Food for Brain : तुम्हीसुद्धा बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यांसारखे जंक फूड खात (Junk Food) आहात का? खात असाल तर आताच सावध व्हा. कारण नुकत्याच झालेल्या एका संशोधनात जंक फुडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासात असे स्पष्टपण नमूद करण्यात आले आहे की असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने मेंदूचे कार्य (Junk Food for Brain) आणि त्याच्या बिहेव्हियरवर गंभीर परिणाम होतो. जंक फुडबाबत आधीही इशारा देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (World Health Organization) आजमितीस जगात सर्वाधिक मृत्यू हृदयविकारामुळे होत आहेत. याचे एक कारण जंक फूड देखील आहे. अमेरिकी अल्झायमर असोसिएशनच्या एक आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणजेच जंक फूड जास्त प्रमाणात खाणाऱ्या लोकांत गंभीर डीमेंशियाचा धोका निर्माण होऊ शकतो.
हा एक असा आजार आहे ज्यामध्ये स्मरणशक्ती, भाषा, रिजनिंग पॉवर आणि विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. जंक फूड खाल्ल्याने मेंदूवर नेमका काय परिणाम होतो याची माहिती घेऊ या..
प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ ठेवणे अन् खाणे धोकादायकच; ‘या’ आजारांना मिळते आमंत्रण..
मेमरी अन् डिसिजन मेकिंगमध्ये गडबड
जंक फूड हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय (Heart Health) घातक आहे. मेंदूवरही त्याचा तितकाच विपरीत परिणाम होतो. जंक फूड मधील ट्रान्स फॅट आणि साखर यांमुळे मेमरी पॉवर आणि निर्णय घेण्याची क्षमता यांवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. दीर्घ काळ जर तुम्ही जंक फूड खात असाल तर डीमेंशिया सारखा धोकादायक आजार बळावण्याची दाट शक्यता असते.
मेंदूच्या रचनेत बिघाड होऊ शकतो
जास्त प्रमाणात कॅलरी असणारे जंक फूड मेंदूच्या रचनेवर वाईट परिणाम करतात. यामध्ये असणारे उच्च फॅट आणि शुगर मेंदूच्या हिप्पोकॅम्पस भागाला प्रभावित करतात. मेंदूचा हा भाग शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचा असतो. जास्त जंक फूड हिप्पोकॅम्पसचे न्यूरॉन्सना नुकसान करण्याचे काम करतात.
न्यूरोट्रान्समीटरचे संतुलन बिघडू शकते
जंक फूड खाल्ल्याने मेंदूत न्यूरोट्रान्समीटरचे संतुलन बिघडू शकते. न्यूरोट्रान्समीटर केमिकल मेंदूच्या वेगवेगळ्या भागात संदेश पाठवण्याचे काम करते. जास्त प्रमाणात कॅलरी असणाऱ्या जंक फूडमुळे डोपामाईनची पातळी देखील वाढते. हा भाग मानवाच्या मूडशी संबंधित आहे. डोपामाइन एखाद्या वस्तूचे व्यसन लावू शकतो. यामुळे जंक फूड जास्त खाण्याची इच्छा होत राहते.
मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम
उच्च कॅलरी असणारे जंक फूड खाल्ल्याने मानसिक आरोग्यावर (Mental Health) गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची कमतरता जाणवू शकते. यामुळे नैराश्य, तणाव आणि एंग्जायटी वाढू शकते. ट्रान्स फॅट आणि साखरेचे जास्त प्रमाण मेंदूत सूज येण्यास कारणीभूत ठरू शकते.
वागणुकीत बदल होऊ शकतो
उच्च कॅलरी असणारे जंक फूड खाल्ल्याने वागणुकीत देखील बदल होऊ शकतो. यामुळे स्वभावात चिडचिड, आळस, उदासीनता अशा समस्या निर्माण होऊ शकतात. जंक फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने स्वभावात रागीटपणा आणि आक्रमकता वाढू शकते. जंक फूडमध्ये असणारे केमिकल्सचा परिणाम मेंदूतील भावना आणि वर्तणूक नियंत्रित करणाऱ्या भागावर होऊ शकतो.
टीप : ही माहिती फक्त सामान्य माहितीच्या आधारावर आहे त्यामुळे माहितीची खात्री करता येत नाही. कोणतीही माहिती अमलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.