Download App

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला मारिया ब्रान्यास यांचं निधन; 117 वर्ष 168 दिवसांनी घेतला अखेरचा श्वास

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला मारिया ब्रान्यास यांचं निधन झालं आहे. त्यांचं वय 117 वर्षे 168 दिवस इतक झालं होतं.

  • Written By: Last Updated:

World oldest woman Maria Branyas Passed Away :  जगातील सर्वात वयोवृद्ध महिला मारिया ब्रान्यास यांचं निधन झालं आहे. त्यांचं वय 117 वर्षे 168 इतक झालं होतं. मारियाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. (Passed Away)जानेवारी 2023 मध्ये फ्रेंच नन लुसिल रँडनच्या मृत्यूनंतर, मारिया जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनल्या होत्या. उत्तर-पूर्व स्पेनमधील ओलोट शहरात मारिया यांचा मृत्यू झाला.

Sexual Assault : हे कुठं थांबणार? अश्लील व्हिडीओ दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

मारिया ब्रान्यास या एका पत्रकाराची मुलगी होत्या. त्यांचा जन्म 4 मार्च 1907 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात झाला होता. 1914 मध्ये त्या स्पेनला परतल्या होत्या. त्यांनी वेरोना येथील रुग्णालयात आरोग्य सेवा अधिकारी म्हणून काम केलं होतं. त्याआधी त्यांनी परिचारिका म्हणूनही काम केलं होते. मारियाला दोन मुली आहेत, तर तिचा एकुलता एक मुलगा वयाच्या ८६ व्या वर्षी मरण पावला आहे. तर मारिया ब्रान्यास यांना 11 नातवंडं आहेत.

Badlapur School Case : राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, बदलापूर प्रकरणात SIT स्थापन

मारिया ब्रान्यास यांना 2020 मध्ये कोरोना विषाणूची लागन झाली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना काही झालं नाही. दरम्यान, 2023 नंतर त्यांची तब्येत खालावत चालली होती. कुठला त्रास त्यांना नव्हता. परंतु, वाढत्या वयामुळे त्या थकत चालल्या होत्या अशी माहिती कुटुंबाने दिली आहे. मारिया यांच्या मृत्यूनंतर जपानचा तोमिको इत्सुका आता जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले आहेत. इतुका यांचा जन्म २३ मे १९०८ रोजी झाला आहे.

follow us

संबंधित बातम्या