Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन

Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन

Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचं निधन झाले आहे. यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसल्याचे पाहायला मिळतंय. 72 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या गोड आणि मधुर आवाजाने ते लाखो हृदयांवर राज्य करत असे. पंकज उधास हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते, कर्करोगामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली.

त्यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांची गाण्याची आवड निर्माण झाली. आपल्या मोठ्या भावाच्या मदतीने त्याने स्टेजवर परफॉर्म करण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याने आपल्या आवाजाने लोकांच्या हृदयावर राज्य करण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nayaab Udhas (@nayaabudhas)


भारत-चीन युद्धाच्या वेळी हे गाणे गायले : 1962 मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान त्यांनी स्टेज परफॉर्मन्स दिला होता. ते स्टेजवर ‘आये मेरे वतन के लोगों’ हे गाणं म्हणत होते. लोकांना त्याच्या आवाजाचे वेड लागले होते. तेवढ्यात गर्दीतून एक माणूस आला आणि त्याला 51 रुपये दिले. पंकज पुढे जात राहिले आणि त्यानंतर 1972 मध्ये त्यांनी ‘कामना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

लेकीने याबद्दल माहिती दिली: इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना, गायकाच्या लेकीने लिहिले, “अत्यंत जड अंतःकरणाने, 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला दुःख होत आहे.” गायक अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. ते बरेच दिवस आजारी होते. ते वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांना 10 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंकज उधास यांचा ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता मृत्यू झाला. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज