Download App

मोदी सरकारविरोधात एक्सचा शड्डू! काही पोस्ट डिलीट करण्याचे आदेश; कंपनीचा सपशेल नकार

नवी दिल्ली : भारत सरकारने आपल्याला काही पोस्ट आणि अकाऊंट्स डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा एक्स (ट्विटर) कडून करण्यात आला आहे. ग्लोबल गव्हर्नन्स अफेअर्स अकाऊंटच्या माध्यमातून एक्सने हा दावा केला आहे. मात्र भारत सरकारच्या (Government of India) या आदेशासोबत आपण असमहत असल्याचे म्हणत या पोस्ट आणि अकाऊंट्स पूर्णपणे डिलीट करण्यास एक्सने नकार दिला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध एक्स असा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. (X says it got orders from India to withhold some accounts, posts)

एक्सने ग्लोबल गव्हर्नन्स अफेअर्स अकाऊंटवर म्हटले की, भारत सरकारच्या आदेशानुसार आम्हाला भारतात दंड आणि तुरुंगवासासह संभाव्य शिक्षेच्या अधीन असलेल्या काही पोस्ट डिलीट तर काही अकाऊंट्स बंद करायचे आहेत. पण सरकारच्या या आदेशासोबत आम्ही असहमत आहोत. कारण युजर्सच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही आपण आदर केला पाहिजे असे आम्ही मानतो. त्यामुळे आम्ही या पोस्ट पूर्णपणे डिलीट करु शकत नाही.

ठाकरेंचा आणखी एक वाघ अडचणीत : अनिल देसाई ED च्या रडारवर, खासगी सचिवावर गुन्हा दाखल

मात्र भारत सरकारच्या स्थगिती आदेशांना आव्हान देणारी रिट अपील प्रलंबित आहे, त्यामुळे केवळ भारतात या पोस्ट आणि अकाऊंट्सवर निर्बंध घालण्यात आले आहेत. इतर ठिकाणी मात्र यावर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. याबाबत संबंधित युजर्सनाही कळविण्यात आले आहे. कायदेशीर निर्बंधांमुळे आम्ही सरकारी आदेश प्रकाशित करू शकत नाही, परंतु पारदर्शकतेसाठी ते सार्वजनिक करणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे, असेही कंपनीने म्हंटले आहे.

तुकाराम महाराजांची सपशेल माफी अन् बारस्करांवर आरोप : CM शिंदेंचा प्रवक्ता पाठिंबा देत असल्याचा जरांगेंचा दावा

दरम्यान, एक्सने असे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भारत सरकार आणि एक्समध्ये याच मुद्द्यावरुन जुंपली होती. 2021 मध्येही भारत सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे, असा थेट आरोप एक्सने केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत सरकारने पल्याला काही पोस्ट आणि अकाऊंट्स डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख करत डिलीट न करता त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

follow us