मस्क आणखी श्रीमंत होणार; एक्सवर पोस्ट, लाईक अन् रिप्लायसाठी यूजर्सना मोजावे लागणार पैसे

X to charge money from new users for posting, liking and replying to tweets : इलॉन मस्कच्या (Elon Musk) संपत्तीत आणखी वाढ होणार आहे. कारण, मस्कनं त्याची संपत्ती वाढवण्यासाठी नवीन क्लृप्ती शोधून काढली आहे. या नव्या क्लृप्तीमुळे मस्कच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होणार आहे. कारण, येथून पुढे एक्स यूजर्सना पोस्टला लाईक आणि रिप्लाय करण्यासाठी पैसे मोजावे लागणार […]

मस्क आणखी श्रीमंत होणार; एक्सवर पोस्ट, लाईक अन् रिप्लायसाठी यूजर्सना मोजावे लागणार पैसे

मस्क आणखी श्रीमंत होणार; एक्सवर पोस्ट, लाईक अन् रिप्लायसाठी यूजर्सना मोजावे लागणार पैसे

X to charge money from new users for posting, liking and replying to tweets : इलॉन मस्कच्या (Elon Musk) संपत्तीत आणखी वाढ होणार आहे. कारण, मस्कनं त्याची संपत्ती वाढवण्यासाठी नवीन क्लृप्ती शोधून काढली आहे. या नव्या क्लृप्तीमुळे मस्कच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होणार आहे. कारण, येथून पुढे एक्स यूजर्सना पोस्टला लाईक आणि रिप्लाय करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. यापूर्वी मस्कने X वर ब्लू टिकसाठी शुल्क आकरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मस्कने एक्स यूजर्सना पोस्ट लाईक आणि त्यावर रिप्लायसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे म्हटले आहे. मस्कच्या या निर्णयामुळे एक्स यूजर्सना मोठा झटका बसला आहे.

नाखूश कर्मचाऱ्यांसाठी Unhappy Leaves; 10 दिवसांच्या सुट्टीत मूड होणार रिफ्रेश

या नव्या निर्णयाबाबत मस्कने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, नवीन वापरकर्त्यांसाठी एक मोठी योजना बनवण्यात आली आहे. त्यानुसार X वर येणाऱ्या नवीन वापरकर्त्यांना पोस्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. ही रक्कम नाममात्र असेल असे त्याने म्हटले आहे. पण ते नेमके किती याबद्दलचा
खुलासा मस्कने पोस्टमध्ये केलेला नाही.

पोस्टसाठी पैसे आकारल्यामुळे बॉट्स आणि बनावट खात्यांवरील पोस्ट कमी होतील असा विश्वास मस्कने व्यक्त केला आहे. चुकीच्या पोस्ट थांबवण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे मस्कने म्हटले आहे. त्यामुळे आता एक्सवरील नव्या यूजर्सला X वर पोस्ट करणे, एखाद्याच्या पोस्टला लाइक करणे, पोस्ट बुकमार्क करणे आणि एखाद्या पोस्टला रिप्लाय देण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे.

Exit mobile version