Iran War you will be alone Trump rebukes Netanyahu over attacks on Hezbollah : इस्त्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेल्या इराण विरुद्धच्या युद्धामध्ये युद्धविराम सुरू असताना देखील इस्त्रायलने बेरुतसह हिसबुल्लाहच्या विविध तळांवर हवाई हल्ले सुरूच ठेवले होते. त्याला उत्तर म्हणून इराणने रविवारी रात्री उशिरा इस्त्रायलच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली. ज्यामुळे हे युद्धाचे ढग आणखी दाट झाले. मात्र या सगळ्यामद्ये एक ट्विस्ट समोर आलाय. तो म्हणजे या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे.
नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
ट्रम्प यांनी एक्सियोस या ठिकाणी इंटरव्यू देताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इशारा दिला आहे. या इंटरव्यूमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, मी म्हटलंय, बीबी तुम्हाला सावध राहावं लागेल. नाहीतर या युद्धात तुम्ही एकटे पडाल. असं म्हणत ट्रम्प यांनी इस्त्रायलला थेट निर्वाणीचा इशाराच दिला आहे.
अजितदादांविषयी अपशब्दानंतर पक्षातून हकालपट्टी, हे सर्व प्री प्लॅन… म्हणत मासाळ आक्रमक
दरम्यान एकीकडे सध्या युद्धबंदी सुरू आहेय तरी देखील होर्मुझमधील तणाव कायम आहे. त्यामुळे लवकरात लवकर इराणशी सुरू असलेल्या वाटाघाटींना यश येऊन हे युद्ध संपवण्याकडे अमेरिकेचा कल दिसतोय. त्यामुळेच या प्रयत्नांच्या दरम्यान इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी बिघडू नये. यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचा स्पष्ट दिसत आहे.
