Download App

धक्कादायक! 50 हत्ती कापणार, मांस घराघरात वाटणार; ‘या’ देशात निघालं फर्मान, कारण काय..

याच जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जिथे जवळपास 50 हत्तींना मारण्याचं (African Elephant) फर्मान काढण्यात आलं आहे.

Zimbabwe News : जगभरात एकीकडे वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी अभियान चालवले जात आहे. वन्यप्राण्यांसाठी (Zimbabwe News) काम करणाऱ्या संघटना आणि सरकार यांसाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत. पण, दुसरीकडे याच जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जिथे जवळपास 50 हत्तींना मारण्याचं (African Elephant) फर्मान काढण्यात आलं आहे. होय हे खरं आहे. फर्मान फक्त इतकंच नाही की हत्तींना मारा तर मारल्यानंतर त्यांना कापून त्यांचे मांस स्थानिक समुदायांत वितरीत करण्याचेही आदेश आहेत. हत्तींचे दात मात्र सरकारकडे जमा केले जाणार आहेत.

आफ्रिकेतील झिम्बाब्वे देशातील हा आदेश आहे. येथील सेव व्हॅली कंजर्वन्सीमध्ये 50 हत्तींना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वृत्त लिहीपर्यंत कदाचित या आदेशाची अंमलबजावणी झालीही असेल. असा निर्णय घेण्यामागे कारण काय तर हत्तींची वाढलेली संख्या. वन्यजीव अधिकाऱ्यांनुसार, या खासगी ठिकाणी हत्तींची संख्या वाढली आहे. यामुळे ईको सिस्टमवरील दबाव वाढला आहे. तसेच मानव वन्यजीव संघर्षाचा धोका निर्माण होत आहे.

ट्रम्प सरकार हैराण! अमेरिकेत हिंसक प्रदर्शने, वाहनांना आगी लावल्या; आंदोलक पोलिसांत झटापट

झिम्बाब्वे पार्क आणि वन्यजीव प्रबंधन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार या रिजर्वमध्ये जवळपास 2550 हत्ती आहेत. येथील क्षमता फक्त 800 इतकी आहे. त्यामुळे हत्तींना मारण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. या हत्तींना मारल्यानंतर त्यांचे मांस स्थानिक लोकांना वाटण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी या निर्णयावर टीका केली आहे.

हत्तींच्या दातांंचं काय होणार

हत्ती मारल्यानंतर त्यांचे दात काढून सरकारकडे सुपूर्द करण्यात येतील. हत्तीच्या दातांच्या व्यापारावर जगभरात बंदी आहे. त्यामुळे झिम्बाब्वे सरकारला जागतिक बाजारात दात विकता येणार नाहीत. मागील पाच वर्षांच्या काळात अधिकाऱ्यांनी 200 हत्ती दुसऱ्या पार्कमध्ये पाठवून दिले आहेत. परंतु, येथील परिस्थिती पाहता हे प्रयत्न अपुरे आहेत असे सांगितले जात आहे.

बोट्सवानानंतर झिम्बाब्वे हत्तींचे जगातील दुसरे मोठे घर आहे. या देशात हत्तींची संख्या खूप जास्त आहे. सध्याच्या काळात हवामानात मोठे बदल होत आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. भोजन आणि पाण्याच्या शोधात हत्ती मानवी वस्तीत येत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांत झिम्बाब्वेत हत्तींचा मारण्याचा निर्णय दुसऱ्यांदा घेण्यात आला आहे.

मागील वर्षात 200 हत्तींची कत्तल

सन 2024 मध्ये झिम्बाब्वेत भीषण दु्ष्काळ पडला होता. त्यामुळे येथे 200 हत्तींना मारण्याची परवानगी देण्यात आली होती. 1988 नंतर पहिल्यांदाच असं घडलं होतं. हत्तींना मारल्यानं देशाच्या प्रतिमेचं नुकसान झालं आहे असे वन्यजीव आणि पर्यटनाशी संबंधित लोकांचं म्हणणं आहे.

follow us