देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड पुन्हा चर्चेत! माजी ‘सीईओ’च्या बेहिशेबी मालमत्तेने गाठला नवा उच्चांक

सीबीआय तपासात बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्या मालमत्तेचा तपशील पुढे आला आहे.

News Photo   2026 07 05T155638.116

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड पुन्हा चर्चेत! माजी 'सीईओ'च्या बेहिशेबी मालमत्तेने गाठला नवा उच्चांक

नाशिक परिसरातील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात  (Fraud) पुन्हा एकदा धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याविरुद्ध सीबीआयने बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचं म्हणजे, ५२ हजारांवरुन अजय कुमार यांच्या संपत्तीने ५.५९ कोटींवर गेल्याने त्यांची ही संपत्ती संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे.

या गुन्ह्यात अधिकाऱ्यासह या बेकायदेशीर उत्पन्नात त्यांना प्रत्यक्ष साथ देणाऱ्या आणि गुन्ह्यास प्रवृत्त करणाऱ्या त्यांच्या पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनाही सीबीआयने सहसंशयित केलं आहे. २०१२ च्या बॅचचे आयडीईएस अधिकारी असलेले अजय कुमार यांची मालमत्ता इतकी झपाट्याने ५.५९ कोटींवर पोहचली की, त्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.  सीबीआयने १ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४ या कालावधीतील अजय कुमार यांच्या कायदेशीर मालमत्तेचा तपास केला.

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार सकारात्मक, तज्ञ समितीचा अहवाल मागवणार

सुरूवातीला त्यांची मालमत्ता केवळ ५२ हजार रुपये होती. हा तपास पूर्ण होईपर्यंत मालमत्तेचा आकडा ५ कोटी ५९ लाख ६७ हजारावर गेला. तर दुसरीकडं याच काळात त्यांनी ५ कोटी १७ लाख रुपये खर्च केले. याचाच अर्थ त्यांची बचत फक्त १३ लाख ६४ हजार रुपये झाली. असं असतानाही, त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. याबाबत कोणताही कायदेशीर स्त्रोत त्यांच्याकडून सीबीआयला देण्यात आलेला नाही.

काळा पैसा आणि संपत्ती लपवण्यासाठी अथवा हस्तांतरित करण्यासाठी अजय कुमार यांना पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनी मदत केल्यामुळं त्यांच्याविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा इतका मोठा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात अडकल्याने इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. सीबीआय तपासात बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्या मालमत्तेचा तपशील पुढं आला आहे.

तपशिलानुसार, सीबीआयने तपास सुरु करण्यापूर्वीची एकूण संपत्ती – रुपये ५२,४२८.५६, तपास कालावधी पूर्ण झाल्यानंतरची संपत्ती – रुपये ५,५९,६७,८१५, तपास कालावधीतील अधिकृत उत्पन्न – रुपये ५,०४,२८,९२४, तपास कालावधीतील एकूण खर्च -रुपये ५,१७,९३,०४४, अपेक्षित बचत –रुपये १३,६४,१२०, एकूण बेहिशेबी मालमत्ता – रुपये ५,७२,७९,५०६.४४ असे एकंदर विवरण आहे.

Exit mobile version