आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार, लूकआउट नोटीस जारी करा, नितेश राणेंची मागणी

अटकेच्या भीतीमुळे आदित्य ठाकरे देशाबाहेर जाण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची तयारी असल्याची माहिती असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

Untitled Design   2026 10 05T151152.673

Untitled Design 2026 10 05T151152.673

Aditya Thackeray will flee the country : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना उबाठाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांच्या पासपोर्ट जप्तीची आणि लूकआउट नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांशी बोलताना राणे यांनी दावा केला की, अटकेच्या भीतीमुळे आदित्य ठाकरे देशाबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे परदेशात जाण्याची तयारी असल्याची माहिती असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळे गृह विभागाने तातडीने त्यांचा पासपोर्ट जप्त करून सर्व विमानतळांवर अलर्ट जारी करावा, अशी मागणी राणे यांनी केली.

दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर आणि विविध जबाबांमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव 13 वेळा आल्याचा दावा राणेंनी केला. तसेच पालिका कंत्राट प्रकरणात अटक झालेला अभिनेता डिनो मोरिया हा फक्त मुखवटा असून, त्याचा खरा गॉडफादर आदित्य ठाकरे असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाच्या जाहीर मंचावर आदित्य ठाकरे उपस्थित राहिले नाहीत, यावरून देखील राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. तापाचे कारण सांगितले जात असलेतरी ते अटकेच्या भीतीने लपून बसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. सध्या आदित्य ठाकरे मुंबईतील मातोश्रीवर आहेत की परदेशात गेले आहेत,याची गृहमंत्रालयाने तातडीने खातरजमा करावी, अशी मागणी देखील राणेंनी केली.

विद्यार्थी पुणे बंद पाडतील आणि मंत्रालयावर धडकतील, रोहित पवारांचा सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम

दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण मंगळवारी, 6 ऑक्टोबर रोजी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. नुकतेच विवेकानंद पाटील पंचाशी बोलणे झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आपण त्यांच्या सोबत बसणार असल्याचे त्यांनी म्हटले.

एमपीएससी अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी, हजारो-लाखो विद्यार्थी राजीनाम्याची मागणी करत असतानाही अध्यक्ष पदावर का कायम आहेत, असा सवाल केला. विद्यार्थ्यांना आंदोलन करून एमपीएससीच्या दारात बसण्याची वेळ का यावी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे एकीकडे दिशा सालियन प्रकरणावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून ठाकरे विरुद्ध राणे संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version