बिबट्यांचा वावर असलेल्या भागांत वनविभागाची यंत्रणा सज्ज ठेवा; आमदार अमोल खताळ यांच्या सूचना!

Amol Khatal Sangamner Leopard Human Conflict: संगमनेरमध्ये मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या वनविभागाला सूचना.

Amol Khatal reviews measures to prevent human-leopard conflict in Sangamner

Amol Khatal reviews measures to prevent human-leopard conflict in Sangamner

Amol Khatal reviews measures to prevent human-leopard conflict in Sangamner: संगमनेर: बिबट्यांचा वावर असलेल्या भागांत वनविभागाने अधिक सतर्क राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात. मानव-बिबट्या संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. तसेच, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

तुम्ही दहशतवादी कारवाया सुरू ठेवणार आणि चर्चा करा म्हणता?, राहुल गांधींनी पाकिस्तानला थेट सुनावलं

संगमनेर येथील सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 20) आमदार खताळ यांनी वनविभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत प्रस्तावित वनभवन इमारतीचे काम तसेच निझर्णेश्वर, पेमगिरी आणि बाळेश्वर येथील वनपर्यटन विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित कामांची सद्यस्थिती जाणून घेत वनविभागाच्या विविध उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली.

मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनविभागाला आवश्यक साहित्य आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये बिबट बचाव वाहने, ड्रोन, बंदुका आणि पिंजऱ्यांचा समावेश आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स : डूम्सडे’ची भारतात रिलीजपूर्वीच जोरदार क्रेझ, नवी मुंबईत एका तिकिटाची किंमत तब्बल 4 हजार रुपये

बिबट्यांचा वावर असलेल्या भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने बचावकार्य राबवणे यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मानव-बिबट संघर्षाच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

बिबट्यांना सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी प्रशिक्षित असलेल्या संगमनेरच्या बिबट बचाव पथकाने केलेल्या कामाची दखल घेत या पथकाचा सत्कार करण्यात आला. बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशिक्षित पथकाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे आवश्यक प्रशिक्षण, दक्षता आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने पथकाने आपले काम अधिक प्रभावीपणे करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

जंगल परिसरातील पाणवठे सुस्थितीत ठेवणे, तेथे पाण्याची उपलब्धता तपासणे आणि वन्यजीवांना पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे येण्याची वेळ कमी व्हावी, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी वनविभागाने सातत्याने दक्ष राहून काम करावे, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

राज्यात रब्बीची पेरणी इतिहासातील सर्वात नीचांकी पातळीवर; 1972 च्या दुष्काळापेक्षाही यंदाची स्थिती गंभीर!

या बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन ताम्हाणे, नम्रता हिरे यांच्यासह वनविभागातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version