अजितदादा महायुती सोडणार होते? अतुल लोंढेंचा दावा, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरून राजकीय हालचालींना वेग

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठा दावा करत अजित पवार महायुतीची साथ सोडण्याच्या तयारीत होते, असे म्हटले आहे.

Untitled Design   2026 11 12T080058.345

Untitled Design 2026 11 12T080058.345

Atul Londhe makes a major claim the merger of the two NCP factions : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. मात्र, विलीनीकरण झाल्यास दोन्ही पक्ष नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार आणि इंडिया आघाडीत जाणार की महायुतीसोबतच राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचदरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोठा दावा करत अजित पवार महायुतीची साथ सोडण्याच्या तयारीत होते, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव अद्याप शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नसल्याची माहिती राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी ‘एबीपी माझा’ला दिली आहे. अजित पवार हयात असताना ज्या गोष्टींवर चर्चा आणि निर्णय झाले होते, त्या पुढे कशा न्यायच्या, यावरच सध्या चर्चा अडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेते विलीनीकरणासाठी आग्रही असल्याची माहितीही समोर आली आहे.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

या राजकीय घडामोडींदरम्यान राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या भेटीगाठींनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. पाडव्याच्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानंतर तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी सुनेत्रा पवार आणि तटकरे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे.

विलीनीकरणाच्या चर्चांबाबत विचारले असता, सुनेत्रा पवार यांनी जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील, असे सूचक विधान केले होते. त्यांनी विलीनीकरणाच्या शक्यतेला स्पष्ट नकार न दिल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे.

अमूल-मदर डेअरीचा ग्राहकांना झटका ; दूध खरेदीसाठी 12 नोव्हेंबरपासून मोजावे लागणार जास्त पैसे

दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील 20 ते 22 आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार बाहेर पडले, तेव्हा राऊत यांना अशी भविष्यवाणी करता आली नाही, असा टोला बन यांनी लगावला.

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चा, दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटी, तर तिसरीकडे आमदारांच्या संभाव्य बंडाबाबत संजय राऊत यांचा दावा… या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात नेमकी कोणती नवी समीकरणे आकाराला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version