Religion & Politics Intersect on Bageshwar Babas Katha Trail : निवडणूक जिंकून देण्यासाठी राजकीय पक्ष, राजकीय नेते साम, दाम, दंड, भेद या सूत्रांचा वापर करतात. त्याचबरोबर जनतेवर प्रभाव असलेल्या धार्मिक बाबांचाही खुबीने राजकीय वापर करतात. पुढील वर्षे उत्तर प्रदेश (UP), पंजाब (Pujab) विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या दोन्ही राज्यात बाबा, महाराजांचे मोठे प्रस्थ आहे. त्याचा फायदा राजकीय नेते घेण्यासाठी सरसावले आहे. देशात प्रसिद्ध असलेल्या एका बाबाच्या कथेची मागणी सुरू झाली आहे. हा बाबा आहे बागेश्वर धामबाबा म्हणजेच ( Bageshwar Baba) धीरेंद्र कृष्ण शास्त्री. त्यांची दोन्ही राज्यात कशी मागणी आहे कोणते राजकीय पक्षांचे नेते बागेश्वरबाबांची कथा आयोजित करत आहे हे पाहुया…
उत्तर प्रदेशच्या राजकीय केंद्रापासून पंजाबच्या सीमावर्ती पठाणकोटपर्यंत बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथा आयोजनाचा कार्यक्रम चर्चेत आलाय. त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांपेक्षा या कार्यक्रमांचे ठिकाण, आयोजक आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती यामुळे अधिक लक्ष वेधले जातेय. निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्री हे सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसाठी लोकप्रिय धार्मिक व्यक्तिमत्त्व बनलेत. नुकताच त्यांनी उत्तर प्रदेशातील कुंडा येथे चार दिवसांची कथा केलीय. या कार्यक्रमाचे आयोजन जनसत्ता दलाचे स्थानिक आमदार रघुराज प्रताप सिंह यांनी केले होते. त्यानंतर लगेच ते 24 नोव्हेंबरला पंजाबमधील पठाणकोट येथे तीन दिवसांच्या कथेसाठी हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आम आदमी पक्षाचे नेते स्वर्ण सिंह सालारिया यांनी केले आहे. ते आगामी निवडणुकीत पठाणकोटमधील सुजानपूर मतदारसंघातून ‘आप’चे उमेदवार आहेत. या कार्यक्रमात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आपल्या कथांमध्ये, शास्त्री उघडपणे हिंदू धर्माचे समर्थन करतात. त्यामुळे आपनेही त्यांची कथा आयोजित केल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
4 ते 6 डिसेंबर दरम्यान, ते भाजप आमदार बावन सिंग यांनी आयोजित केलेल्या कथेसाठी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे असतील. 11 ते 13 डिसेंबर दरम्यान भाजप आमदार रवी शर्मा यांनी आयोजित केलेल्या आणखी एका कथेसाठी ते झाशीला जाणार आहेत. 17 ते 19 डिसेंबर दरम्यान ते वृंदावनमध्ये असतील. त्यानंतर 21 ते 25 डिसेंबरला ते लखनऊमध्ये असणार आहे. तेथील भाजप आमदार राजेश्वर सिंह ययांनी कथा आयोजित केलीय. आपल्या कथांच्या माध्यमातून शास्त्री राजकीय नेत्यांना निवडणुका सोप्या करतात. कारण यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेश आणि बिहारसह अनेक निवडणूक राज्यांमध्ये कथा आयोजित केल्या आहेत. त्याचा फायदा भाजपला झालेला आहे. परंतु ते आपच्या आमदाराची कथा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे.
धार्मिक व्यासपीठातून राजकीय संपर्क
धीरेंद्र शास्त्री यांच्या कथांमुळे राजकीय नेत्यांना जनतेशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळतेय. शिवाय आचारसंहिता नसल्याने या कार्यक्रमाचा लाखो रुपयांचा खर्चही निवडणूक खर्चात येत नाही. धार्मिकतेमुळे राजकीय नेत्यांनाही फायदाही होता. त्यामुळे धिरेंद्रशास्त्री महाराजांच्या कथांची मागणी वाढलीय.
