Bharat Gogawale On Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच मंत्री भरत गोगावले (bharat gogawale) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना थेट इशारा दिला आहे. “जरांगेंनी राजकारणावर बोललं तर आम्हीही उत्तर देऊ. आम्हीही मराठे आहोत. आमच्यावरही केसेस आहेत,” असे गोगावले यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एकेरी भाषेत बोलले जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठ्यांसाठी तू कलंक, अंतरवालीत ये नाहीतर नको येऊ; मनोज जरांगे पुन्हा विखेंवर संतापले
‘रायगडच्या मावळ्याचा हा इशारा’
मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारवरील टीकेला उत्तर देताना भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतली. “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलत असतील, तर जशास तसे उत्तर देऊ. सांगून टाका त्यांना, रायगडच्या मावळ्याचा हा इशारा आहे,” असे भरत गोगावले म्हणाले.
सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू; विखे पाटलांना जरांगेंचा थेट इशारा
जरांगे यांच्या आंदोलनाच्या राजकीय भूमिकेवरही गोगावले यांनी प्रश्न उपस्थित केला. राजकारणावरून जरांगे यांनी सरकारवर टीका केली तर आपणही राजकीय पद्धतीने उत्तर देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
हैदराबाद गॅझेट आणि आरक्षणावर काय म्हणाले?
हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत गोगावले यांनी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले. “हैदराबाद गॅझेट असेल, आरक्षण असेल, ते ठीक आहे. मात्र, आमच्या नेत्यांवर बोलले तर ते कोणताही नेता सहन करणार नाही,” असे ते म्हणाले.
स्मृती मंधानाची ICC T20 क्रमवारीत थेट टॉप 5 मध्ये झेप, 124 धावांचा धडाका
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला. शिंदे यांनी आरक्षण देताना मागचा-पुढचा विचार केला नाही, शिंदे सरकारच्या काळात 5 हजार 300 जणांना नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा गोगावले यांनी केला. तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी काम करणाऱ्या सारथी संस्थेलाही न्याय देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या धनुष्यबाण विधानावरही भाष्य
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत केलेल्या वक्तव्यावरही भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. “धनुष्यबाण कालपर्यंत आम्हाला मिळालं आणि आता ते गोठवण्याची भाषा करत आहेत,” असे म्हणत त्यांनी ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला.
धनुष्यबाणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन निर्णय पुन्हा आपल्या बाजूने येणार असल्याचा विश्वासही गोगावले यांनी व्यक्त केला. त्यामुळेच विरोधकांकडून धनुष्यबाण गोठवण्याची भाषा केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
फडणवीसांचे 7 महत्त्वपूर्ण निर्णय; खेळाडू, आरोग्य, न्यायव्यवस्था आणि उद्योग क्षेत्राला मोठा लाभ!
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि सरकारविरोधातील जरांगे यांच्या भूमिकेवरून राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
