BMC Election Repeat Voters In Voter List : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच मुंबई महानगरपालिका (BMC) देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) करण्यात आला होता. मतदार याद्यांतील घोळ आणि प्रभागाच्या तोडफोडीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaokar) चांगलेच आक्रमक झालेत. मतदार यादीतील सगळ्या त्रुटी जोपर्यंत दूर होत नाही तोवर निवडणूक घेऊ नका. अशी मागणी देखील त्यांनी केली. एका मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार आहेत. ज्या मतदारांची नावं तीन ते चार ठिकाणी नोंदवली गेलीत. आता निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत. मतदारयादीत त्रुटी असल्याचं मान्य केलंय. मतदारयाद्यांत 11 लाख दुबार मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीय.
मतदारयादीत जी नाव दुबार आहेत अशी नाव हटवण्यासाठी महानगरपालिकेने निवडणूक आयोगकडे वेळ मागितला असल्याची देखील माहिती आहे. त्याचप्रमाणे मतदारयादीत एकाच व्यक्तीच नाव हे एक-दोन नव्हे तर तर 103 वेळेस असल्याचं देखील महानगरपालिकेने सांगितलंय. गेल्या अनेक दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी केलेला दावा खरा ठरलाय. याबाबत त्यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आलं होतं. 4 लाख 33 मतदाराची नाव दुबार नोंदवली गेल्यानं ही संख्या 11 लाखांवर गेली. नोंदवल्या गेलेल्या बनावट मतदाराची इत्यंभूत माहिती नसल्यानं प्रशासन यासाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. 5 डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरु राहणार असून निवडणूक वॉर्डाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही मोहीम राबवणार आहेत.
‘तो’ शब्द वापरायला नको होता…, शिवराळ भाषेनंतर अजितदादांनी व्यक्त केली दिलगिरी
मनसे प्रमुख राज ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे वारंवार मतदारयाद्यांत घोळ असल्याचा दावा करत होते. मात्र आता त्यांच्या तक्रारीला गांभीर्याने घेत खुद्द निवडणूक आयोगानं दुबार मतदार असल्याचं जाहीर करत दुबार मतदारांचा आकडाचं जाहीर केल्यानं राज्यासह संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ उडालीय.
