विरारमध्ये बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि बहिणीचे मृतदेह, एकाच बिल्डिंगमध्ये वर्षभरात तिसरी आत्महत्येची घटना

ग्लोबल सिटी परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

Untitled Design   2026 10 29T161902.495

Untitled Design 2026 10 29T161902.495

Bodies of two brothers and a sister found in a locked flat : विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुमार मनसुखलाल मेहता, दीपेश मनसुखलाल मेहता आणि खेवणा मनसुखलाल मेहता अशी मृतांची नावे आहेत. तिघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी येथील गार्डन अॅव्हेन्यू इमारतीच्या डी विंगमधील के-3 डी, रूम क्रमांक 1203 येथे घडली. संबंधित फ्लॅटमधून तीव्र दुर्गमधी येऊ लागल्याने इमारतीतील रहिवाशांनी सोसायटीच्या सचिवांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बोळींज पोलिसांना कळवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत फ्लॅटची पाहणी केली. यावेळी घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तिघेही सख्खे बहीण-भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एक जण कर्करोगाने त्रस्त होता, तर हे संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाची मागणी अन् बावनकुळेंचा पलटवार, रवींद्र धंगेकरांना म्हणाले, आपली उंची पाहून बोला

या पार्श्वभूमीवर तिघांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून, मृत्यूमागील नेमक्या कारणाचा तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, फॉरेन्सिक पथकाने देखील घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, बोळींज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, याचइमारतीत एका वर्षाच्या कालावधीत आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका माजी लष्करी अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यापूर्वी दहावीच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. एकाच इमारतीत अल्प कालावधीत अशा घटना घडल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. मेहता भावंडांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Exit mobile version