मोठी बातमी! पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब असल्याची चर्चा; न्यायालय परिसर तातडीनं रिकामा

Pune Shivajinagar Court Bomb Scare : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब असल्याची चर्चा पसरताच न्यायालय परिसर रिकामा.

News Photo   2026 11 23T153440.539

Pune Shivajinagar Court Bomb Scare

Pune Shivajinagar Court Bomb Scare : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बॉम्ब ठेवल्याची चर्चा सुरू झाल्याने आज एकच खळबळ उडाली. अचानक पसरलेल्या या माहितीमुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कारवाईमुळे न्यायालयातील नियमित कामकाजावरही परिणाम झाला असून वकील आणि इतर उपस्थितांना बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असतानाच बॉम्ब असल्याची चर्चा पसरली. काही वेळातच ही माहिती न्यायालय परिसरात सर्वत्र पोहोचली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. न्यायालयातील वकील, कर्मचारी आणि इतर नागरिकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी विविध न्यायालयांना ई-मेलद्वारे धमकी पाठवण्यात आली होती. या प्रकारानंतर सुरक्षा यंत्रणांनी राज्यभर सतर्कता वाढवली होती. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयात बॉम्ब असल्याची चर्चा सुरू होताच प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता परिसर रिकामा करण्याची पावले उचलली.

दरम्यान, पुन्हा एकदा न्यायालयाला लक्ष्य केल्याची चर्चा निर्माण झाल्याने पोलीस यंत्रणांसमोर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. मात्र, शिवाजीनगर न्यायालयात प्रत्यक्षात बॉम्ब ठेवण्यात आला आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुरक्षा यंत्रणांकडून परिस्थितीची पडताळणी केली जात आहे.

Exit mobile version