सिप्लाच्या पुणे गोदामाचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

Cipla’s Pune Warehouse Licence Cancelled; Reactin Plus प्रकरणासह नियमभंग आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई.

Cipla’s Pune Warehouse Licence Cancelled

Cipla’s Pune Warehouse Licence Cancelled

Cipla’s Pune Warehouse Licence Cancelled: औषधांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड (Cipla Pharma & Life Sciences Ltd.) वर मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील वडकी येथील कंपनीचे कॅरी अँड फॉरवर्डिंग (C&F) औषध विक्री परवाने 27 ऑगस्ट 2026 पासून रद्द करण्यात आले आहेत.

दिशा सालियन प्रकरणात कोर्टाचा गंभीर सवाल; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण, कोर्टाचं निरीक्षण काय?

जून 2026 मध्ये FDAने कंपनीच्या वडकी येथील गोदामाची तपासणी केली होती. यावेळी रिॲक्टिन प्लस टॅब्लेट्स (Reactin Plus Tablets) या शेड्यूल एच (Schedule H) औषधाच्या पॅकेजिंगवर परवानगी नसलेला ॲनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक (Analgesic and Antipyretic) म्हणजे वेदनाशामक आणि ताप कमी करणारे औषध असा दावा करण्यात आल्याचे आढळले. ‘रिएक्टिन प्लस’ या गोळीमध्ये डायक्लोफेनॅक आणि पॅरासिटामॉलचे मिश्रण असते, जी वेदनाशामक औषधे आहेत आणि ती केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घेणे बंधनकारक आहे. या औषधाच्या साठ्यापैकी 11.19 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

नेपाळमध्ये महापुराने हाहाकार; सरकार महाराष्ट्र पर्यटकांच्या संपर्कात, मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

औषधाच्या पॅकेजिंगवर अशा प्रकारची माहिती दिल्यामुळे नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेऊ शकतात, असा धोका FDAने व्यक्त केला. त्यामुळे कंपनीला रिॲक्टिन प्लसचा साठा बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या निर्देशांचे पूर्ण पालन झाले नसल्याचे तपासणीत समोर आले.

गोदामातही अनेक त्रुटी आढळल्या

कंपनीच्या गोदामाची तपासणी करताना औषधांच्या साठवणुकीतही अनेक त्रुटी आढळल्या. प्रत्यक्ष औषधसाठा आणि संगणकीकृत नोंदी जुळत नव्हत्या. काही औषधे थेट जमिनीवर ठेवलेली होती. तसेच औषध ठेवण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था अपुरी होती. याशिवाय बाजारातून औषधांचा साठा परत मागवणे, मुदतबाह्य औषधांचे व्यवस्थापन आणि खरेदी-विक्रीच्या नोंदींमध्येही त्रुटी आढळल्या.

राखीपौर्णिमेला अजितदादांची आठवण; सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट, म्हणाल्या ‘तू सोबत नाहीस’

या सर्व प्रकरणी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र, कंपनीच्या स्पष्टीकरणानंतरही त्रुटींचे अपेक्षित निराकरण आणि प्रशासनाच्या निर्देशांचे पूर्ण पालन झाले नसल्याने FDAने सिप्लाच्या वडकी येथील C&F औषध विक्री परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, औषधांची सुरक्षितता आणि नागरिकांचे आरोग्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शेड्यूल एच औषधांची जाहिरात, विक्री, साठवणूक आणि वितरण करताना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

कोलंबो कसोटी ड्रॉ अन् बांगलादेशला फायदा; भारतासाठी WTC गणित बिघडलं

Exit mobile version