राखीपौर्णिमेला अजितदादांची आठवण; सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट, म्हणाल्या ‘तू सोबत नाहीस’
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील भाऊ-बहिणीचं नातं अनेकांसाठी जिव्हाळ्याचं होतं, अशा भावना काही युजर्सनी व्यक्त केल्या.
राखीपौर्णिमा हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा (Rakhi Poornima) आणि बंधुत्वाचा सण म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. सेलिब्रिटींपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेक जण हा सण आपापल्या कुटुंबासोबत साजरा करतात. महाराष्ट्रातील पवार कुटुंबीयांची राखीपौर्णिमाही दरवर्षी चर्चेत असायची. मात्र, सात महिन्यांपूर्वी अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याने यंदाच्या राखीपौर्णिमेला पवार कुटुंबीयांसह त्यांच्या समर्थकांमध्येही भावुक वातावरण पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राखीपौर्णिमेनिमित्त अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. लहानपणापासूनच्या आठवणी, भावा-बहिणीतील प्रेम, भांडणं आणि एकमेकांविषयीचा अभिमान यांचा उल्लेख करत त्यांनी अजितदादांच्या अनुपस्थितीची खंत व्यक्त केली. सात महिन्यांपूर्वी घडलेली घटना आजही मनाला अस्वस्थ करते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. अजितदादा पुन्हा अचानक घरी येतील, राखी बांधून घेतील आणि कुटुंबासोबत गप्पांमध्ये रमतील, अशी भावना मनात आजही असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपसोबत जाणार? सुप्रिया सुळे 8 खासदारांसह PM मोदींना भेटणार
सुप्रिया सुळे यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील भाऊ-बहिणीचं नातं अनेकांसाठी जिव्हाळ्याचं होतं, अशा भावना काही युजर्सनी व्यक्त केल्या. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही राखीपौर्णिमेनिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. महाराष्ट्रातील महिलांचा आत्मसन्मान आणि हक्कांसाठी भाऊ म्हणून उद्धव ठाकरे यांची साथ कायम हवी असल्याचं अंधारे यांनी म्हटलं. तसंच, उद्धव ठाकरे यांनी नेहमी हसतमुख आणि तणावमुक्त राहावं, त्यांचं हसतमुख असणं हेच विरोधकांसाठी जालीम उत्तर असल्याचं सांगत त्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रिय दादा,
आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही.
लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या… pic.twitter.com/rlyUMuslMt
— Supriya Sule (@supriya_sule) August 28, 2026