मोठी बातमी! काँग्रेस पक्षाला धक्का; विधान परिषदेच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद

सोलापूर विधान परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.

Solapur Congres

मोठी बातमी! काँग्रस पक्षा धक्का; विधान परिषदेच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद

सोलापूर विधान परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख जवळ आलेली असतानाच आता काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा अर्जच थेट बाद झाला आहे.

हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला आहे. येथे काँग्रेसने आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज आता बाद झाला आहे. काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं अर्ज पडताळणीत स्पष्ट झालं.

मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून मी फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सही केलेली नाही, असे नगरसेवक नागेश भोसले यांनी स्वयंघोषणापत्रात म्हटलेले आहे. हे स्वयंघोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्यामुळे त्याचाच अधिर घेत आता काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. नागेश भोसले यांनी सही माझी नसल्याचे स्वयंघोषणापत्र दिल्याने काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांना 10 पैकी केवळ 9 सूचक राहिले. त्यामुळेच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला.

 

Exit mobile version