World Mental Health Day : लढाया शांततेत आणि सन्मानाने लढणं, हेच मला योग्य वाटतं – दीपिका पदुकोण

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दीपिका पदुकोण यांनी मध्य प्रदेशला भेट दिली.

Entertainment News (42)

Entertainment News (42)

Deepika Padukone On World Mental Health Day : जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दीपिका पदुकोण यांनी मध्य प्रदेशला भेट दिली. यावेळी त्यांच्या ‘Live Love Laugh’ या फाउंडेशनच्या दहा वर्षांच्या प्रवासाचा विशेष टप्पा साजरा करण्यात आला. ही संस्था गेल्या दशकभरात भारतात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता आणि समर्थन यासाठी महत्त्वपूर्ण काम करत आहे.

मानसिक आरोग्यावर खुलेपणाने चर्चा

मानसिक आरोग्यासाठी (World Mental Health Day) गेल्या अनेक वर्षांपासून प्रभावीपणे आवाज उठवत असलेल्या दीपिकाने (Deepika Padukone) या कार्यक्रमात स्वतःच्या प्रवासावर आणि संस्थेच्या प्रभावावर चिंतन केलं. ही भेट केवळ त्यांच्या संस्थेच्या यशाचा उत्सव नव्हता, तर भारतात मानसिक आरोग्यावर खुलेपणाने चर्चा करण्याचा आग्रह आणि त्यामागची तिची निःस्वार्थ बांधिलकी पुन्हा अधोरेखित करणारी होती.

जेव्हा तिच्याकडे विचारलं गेलं की, “तुम्ही जसं न्याय मागता, त्यासाठी कधी तुम्हाला किंमत मोजावी लागली का?” — यावर दीपिकाने एका अतिशय विचारपूर्वक आणि प्रगल्भ उत्तराने प्रत्युत्तर दिलं, जे तिच्या सौम्य पण ठाम स्वभावाला साजेसं (Madhya Pradesh) होतं.

लढाया शांततेत आणि सन्मानाने

“मी हे अनेक स्तरांवर केलं आहे, हे माझ्यासाठी नवीन नाही. मला वाटतं की वेतनाच्या संदर्भातसुद्धा, मला त्यातून जे काही येतं त्याचा सामना करावा लागतो. मी त्याला नक्की काय म्हणावं हे मला माहीत नाही, पण मी अशी व्यक्ती आहे जी नेहमी आपल्या लढाया शांतपणे लढते. आणि काही विचित्र कारणांमुळे कधीमधी त्या सार्वजनिक होतात, जे मला माहित असलेलं किंवा शिकवलेलं नाही. पण हो, माझ्या लढाया शांततेत आणि सन्मानाने लढणं, हेच मला योग्य वाटतं.”

पडद्यावर आणि पडद्याच्या बाहेर

तिच्या या शब्दांत केवळ तिच्या वैयक्तिक प्रवासाचा नव्हे, तर संपूर्ण उद्योगातील समानता, न्याय आणि आत्मसन्मान यासारख्या मोठ्या मुद्द्यांचाही वेध घेतला आहे. दीपिका तिच्या स्वभावाला साजेसं काम — पडद्यावर आणि पडद्याच्या बाहेर — शांततेने, धैर्याने आणि प्रामाणिकपणे करत राहते.

तिच्या कृतीतून आणि शब्दांतून दीपिका पदुकोण पुन्हा एकदा आपल्याला हेच सांगते की, “शक्ती” ही नेहमीच गोंगाटात नसते — ती कधी कधी शांततेत, सौम्यतेत आणि उद्दिष्टपूर्ण विचारांत सापडते.

Exit mobile version