तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो! रोहित पवारांचा भाजपसोबत जाण्यास विरोध, वेगळी वाट धरण्याचे संकेत

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावरुन राष्ट्रवादीत मतभेद; रोहित पवार भाजपसोबत जाण्यास विरोध करण्याच्या भूमिकेवर ठाम.

News Photo   2026 11 28T143831.346

Delimitation Bill

Delimitation Bill : संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, पक्षातील काही खासदार भाजपला अनुकूल भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील खासदार विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बाजूने असल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मात्र, पक्षातील या संभाव्य राजकीय बदलांमध्ये आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत वेगळे संकेत दिले आहेत. सत्तेसोबत जाण्यापेक्षा विचारधारेच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी अजित पवार यांनी 2022 मध्ये घेतलेल्या वेगळ्या राजकीय निर्णयाचा संदर्भ दिला आहे. त्यावेळी नातेसंबंध बाजूला ठेवून आपण विचारांच्या बाजूने लढलो होतो आणि आजही त्याच भूमिकेवर ठाम असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Delimitation Bill : ‘सत्तेसाठी जगायचं अन् सत्ता घेऊन मरायचं’; वड्डेटीवारांनी पवारांवर टीकेच्या सर्व परिसीमा ओलांडल्या

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाच्या तपासावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांना जाऊन 10 महिने पूर्ण झाले, तरी त्यांच्या अपघात किंवा घातपाताच्या संशयासंदर्भात अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही किंवा कोणताही ठोस तपास झालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूच्या घटनेच्या तपासाबाबत संबंधितांकडून गांभीर्य दाखवले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सत्यापेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे आपण पाहत आहोत, अशा शब्दांत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मात्र, अजितदादांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेला लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 2022 मध्ये अजित पवार यांनी वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला, तेव्हा नात्यापेक्षा विचारांना प्राधान्य दिले होते. आज आणि भविष्यातही आपली हीच भूमिका कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डिलिमिटेशन विधेयकावरुन मतभिन्नता असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्यासह खासदारांची भूमिका विधेयकाला पाठिंबा देण्याची असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या संभाव्य राजकीय समीकरणांपासून अंतर राखण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते आणि तरुण नेतृत्व यांच्यात या मुद्द्यावरुन वेगवेगळे विचारप्रवाह असल्याचे दिसून येत आहे.

राजकीय वर्तुळात शरद पवार यांची राष्ट्रवादी भविष्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य राजकीय समीकरणाच्या बदल्यात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाची मंत्रीपदे मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, अशा प्रकारचा निर्णय झाल्यास रोहित पवार यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या विधानांवरुन सत्तेसाठी राजकीय तडजोड करण्याऐवजी स्वतंत्र भूमिका घेण्याची तयारी त्यांनी ठेवल्याचे संकेत मिळत आहेत.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”mr” dir=”ltr”>आदरणीय अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना FIR झाला ना कुठला तपास झाला…. आभाळाएवढा माणूस गेला पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही. २०२२ मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो.आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल…! #AjitdadaPawar</p>&mdash; Rohit Pawar (@RRPSpeaks) <a href=”https://x.com/RRPSpeaks/status/2126565267576860925?ref_src=twsrc%5Etfw”>November 28, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.x.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

Exit mobile version