डिलिमेटेशनवरून आघाडीत नाराजी? लंके म्हणाले, चुकीच्या पोस्ट करू नका…

Nilesh Lanke On Delimitation : संसदेमध्ये कोणतेही बिल येणार असेल तर राष्ट्रवादी शरद पवार गट हे ते बिल पाहणार व त्याचा अभ्यास करणार

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Nilesh Lanke On Delimitation

Nilesh Lanke On Delimitation : संसदेमध्ये कोणतेही बिल येणार असेल तर राष्ट्रवादी शरद पवार गट हे ते बिल पाहणार व त्याचा अभ्यास करणार व त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व खासदार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही एकत्रित चर्चा करून निर्णय घेऊ असे महत्त्वाची प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली. डिलिमेटेशनबाबतच्या चर्चा सध्या जोर धरत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार हे एनडीएला पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू आहे. यावरती आता अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

तसेच इंडिया आघाडीचे महत्त्वाची बैठक आज सुरू आहे मात्र या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार हे उपस्थित नाही यावरून सुरू असलेल्या चर्चेवरती बोलताना लंके म्हणाले की, या बैठकीला नेहमी खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) उपस्थित असतात मात्र शरद पवारांची प्रकृती स्वस्त नसल्याने सुप्रियाताई या शरद पवारांसोबत आहेत. त्यानंतर मला त्या बैठकीला जाण्यासाठी सांगितले मात्र माझा पूर्वनियोजित दौरा असल्याने मला जाणे शक्य झाले नाही. तसेच माझा दौरा लवकर पूर्ण झाला तर मी दिल्लीला जाईल असं देखील यावेळी लंके (Nilesh Lanke) म्हणाले. काँग्रेस (Congress) नाराज व्हायचा, शिवसेना (Shivsena) नाराज व्हायचा काही संबंध नाही आमचे घटक पक्ष शिवसेना असेल किंवा काँग्रेस हे कोणीही नाराज नाही कारण आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. डिलिमेटेशनबाबत अद्याप आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे कोणत्याही पोस्ट सोशल मीडियावर करणे हे चुकीचे आहे असं देखील लंके म्हणाले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

राऊतांच्या दीडशे कोटींच्या दाव्यावर लंकेचे स्पष्टीकरण

डिलिमेटेशन बिल मंजूर करण्यासाठी खासदारांना आमिष दाखवण्यात आले असून यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले की, या खासदारांना दीडशे कोटीचे आमिष दाखवण्यात आले आहे. यावरती बोलताना निलेश लंके म्हणाले, संजय राऊत यांना काय माहिती आहे आम्हाला त्याची कल्पना नाही मात्र आमच्या कुठल्याही खासदारांपर्यंत दीडशे कोटीची चर्चा कानावर आलेल्या नाही असं लंके म्हणाले.

follow us