दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण

Devendra Fadnavis Latur Visit: दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.

Devendra Fadnavis Latur Visit

Devendra Fadnavis Latur Visit

Devendra Fadnavis Latur Visit: लातूरमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत असतानाच एका शेतकऱ्याला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांसमोरच त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि काही क्षणांतच त्याचा अश्रूंचा बांध फुटला.

SIR वर दोन आयुक्तांचे 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप? विरोधकांचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल नेमकं प्रकरण काय?

शेतकऱ्याची व्यथा ऐकताना फडणवीस यांनी त्याला जवळ घेत धीर दिला. या प्रसंगाने घटनास्थळी उपस्थित असलेले शेतकरी आणि अधिकारीही काही क्षण भावूक झाले. दुष्काळामुळे शेतीची झालेली अवस्था आणि त्यातून निर्माण झालेली चिंता या भेटीत प्रकर्षाने समोर आली.

मुख्यमंत्री लातूरात दाखल; दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची पाहणी केली. पावसाअभावी शेतीवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी याबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी काही महिलांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत ‘तुम्ही आमचे लाडके भाऊ आहात’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

IIT Bombay: साहिल वाकोडे मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; प्रा. डुल्ला रजेवर, आज क्राईम ब्रांचसमोर होणार हजर

दरम्यान, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत केवळ 50 टक्के पाऊस झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे या भागातील परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. दुष्काळाच्या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, अशी खात्रीही त्यांनी दिली आहे.

Exit mobile version