दिशा सालियन मृत्यू प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; FIR दाखल करण्याचे आदेश, CBI कडे तपास

Disha Salian death case दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई हायकोर्टाने CBI चौकशीचे आदेश दिले, पुरावा नसताना कोणालाही आरोपी न मानण्याचे निर्देश.

Disha Salian death case

Disha Salian death case

Bombay HC orders CBI probe into Disha Salian death case: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज 2 सप्टेंबर रोजी महत्त्वाचा निर्णय दिला. दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी FIR दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले.

एकीकडे डिफेंडर गाडी पण जरांगेंना उपोषणाला ‘ती’ लाल गोधडीच का लागते? हाकेंना वेगळाच संशय

8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीतून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. ती 28 वर्षांची होती. दिशाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबतही काम केलं होतं. सुशांत सिंह राजपूत याचा त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी,म्हणजे 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील राहत्या घरी मृत्यू झाला होता.

दिशा सालियनच्या मृत्यूभोवती संशयास्पद परिस्थिती असल्याचा दावा तिचे वडील सतीश सालियन यांनी केला होता. त्यांच्या वतीने अ‍ॅड. निलेश ओझा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिशाच्या मृत्यूची हत्या म्हणून चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच, या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवावा, अशी मागणीही करण्यात आली होती.

जरांगे खालावले, मराठे पेटले! बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!

या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने 28 ऑगस्ट रोजी निर्णय राखून ठेवला होता. अखेर बुधवारी 2 सप्टेंबरला न्यायालयाने FIR नोंदवण्याचे निर्देश दिले.

‘संशयास वाव असल्यासच पुढील कारवाई’

न्यायालयाने आपल्या आदेशात तपासादरम्यान योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळण्यावर भर दिला. प्रकरणात CBIशी संबंधित अधिकाऱ्याने FIR नोंदवून तपास करावा, असे निर्देश देण्यात आले. तसेच, ठोस आणि वाजवी संशय निर्माण झाल्याशिवाय कोणालाही ताब्यात घेऊ नये, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

‘भाजपचा पहिला फेकू कोण?’; संदीप देशपांडेंचा भाजपवर थेट निशाणा

या तपासात काही तथ्य आढळून न आल्यास BNSSच्या तरतुदींनुसार सारांश अहवाल दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई पोलिसांच्या तपासावर उपस्थित झाले होते प्रश्न

यापूर्वी सुनावणीदरम्यान दिशा सालियन यांच्या कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा आरोप करूनही मुंबई पोलिसांनी FIR का दाखल केली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अ‍ॅड. निलेश ओझा यांनीही न्यायालयासमोर पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत नव्याने चौकशीची मागणी केली होती.

ठाकरेंचा युक्तिवाद संपला; आजपासून शिंदे गटाची ‘बॅटिंग’, शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी

आता हायकोर्टाने FIR नोंदवण्याचे आणि CBIमार्फत तपास करण्याचे निर्देश दिल्याने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

Exit mobile version