उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली; ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू, सर्व कार्यक्रम रद्द

सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती सातत्याने तपासली जात आहे.

Untitled Design 79

Untitled Design 79

Eknath Shinde’s health has deteriorated : राज्याचे उपमुख्यमंत्री एकणस्थ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी, ऑपरेशन टायगर संदर्भातील हालचाली आणि आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीमुळे त्यांची मोठी धावपळ सुरू होती. या सततच्या व्यस्त वेळापत्रकाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे सांगितले जात असून, शुक्रवारी त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. मात्र व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत काम सुरूच ठेवले. ताप अंगावर काढत त्यांनी विविध बैठक आणि राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावली. अखेर प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती सातत्याने तपासली जात आहे. शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर चिंता करण्याचे कारण नाही. योग्य उपचार आणि विश्रांतीनंतर ते लवकरच पुर्ववत कामकाजाला सुरूवात करतील, असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला आहे.

गुजरात-मध्य प्रदेशात एकाचवेळी छापे; दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 8 जणांना अटक

प्रकृती बिघडल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे पुढील काही दिवसांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विविध बैठक, पक्षीय कार्यक्रम तसेच नियोजित राजकीय दौरे देखील पुढे ढकलण्यात आले असून, डॉक्टरांनी त्यांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला देखील फटका बसला आहे. शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश शुक्रवारी दुपारी चार वाजता होणार होता. मात्र एकनाथ शिंदे यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे हा पक्षप्रवेश सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबतची ही बातमी चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा कार्यकर्ते आणि समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. तर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा नियमित राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतील, अशी अपेक्षा व्यक्त केयी जात आहे.

Exit mobile version