एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड! पंढरपूरमध्ये 20 मिनिटे ताटकळले, अखेर रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना

पंढरपूरमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याने शिंदे यांना तब्बल 20 मिनिटे हेलिपॅडवर थांबावे लागले.

Untitled Design   2026 11 19T173943.275

Untitled Design 2026 11 19T173943.275

Eknath Shinde’s helicopter suddenly malfunctions : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पंढरपूरमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याने शिंदे यांना तब्बल 20 मिनिटे हेलिपॅडवर थांबावे लागले. अखेर सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका न पत्करता त्यांनी रस्तेमार्गे पुढील प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले असून, तेथून पुढील प्रवास विमानाने करण्याची शक्यता आहे.

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर दौऱ्यावर आलेले एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि चंद्रभागा नदी परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच कार्तिकी वारीच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर मुंबईला रवाना होण्यासाठी ते हेलिपॅडवर पोहोचले. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर ते सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तांत्रिक अडचण निर्माण झाली. हेलिकॉप्टरची एक इंजिन सुरू होत होते, मात्र दुसरे इंजिन सुरू होण्यात अडथळा येत होता. बॅटरीची क्षमता कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नाना पटोले थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण

हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याने घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि प्रशासनाची धावपळ उडाली. हेलिकॉप्टरची बॅटरी बदलण्यासाठी दुसरी बॅटरी मागवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, तांत्रिक अडचण दूर होण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याने शिंदे यांना हेलिपॅडवर थांबावे लागले. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कोणताही धोका न पत्करता रस्तेमार्गे प्रवास करण्याची विनंती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करण्याऐवजी रस्तेमार्गे पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.

या घटनेबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजीत पाटील यांनीही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे कार्तिकी वारीच्या नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. त्यानंतर तेथून उपस्थित लोक बाजूला झाले. मात्र, हेलिकॉप्टर सुरू होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते पुन्हा जवळ गेले. त्यावेळी पायलटने एका इंजिनला सुरुवात झाली असली, तरी दुसरे इंजिन सुरू करण्यासाठी बॅटरीची क्षमता कमी पडत असल्याचे सांगितले.

EPFO चा सगळ्यात धांसू प्लान! रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार नियमित उत्पन्न

तांत्रिक अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी पुण्यातून विमानाने पुढील प्रवास करण्याची विनंती केली. त्यानुसार एकनाथ शिंदे पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती अभिजीत पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांच्या नियोजित प्रवासात बदल करावा लागला. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेला शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता हेलिकॉप्टरमधील बिघाडाचे नेमके कारण काय, याबाबत तांत्रिक तपासणीनंतर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version