Mahipalpur Explosion : दिल्लीत आणखी एक स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, दिल्लीतील महिपालपूरमधील रेडिसन हॉटेलजवळ स्फोटसदृश घटना घडली असून परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या रवाना झाल्या आहे. तर दुसरीकडे काहीही संशयास्पद नसल्याचे पुष्टी दिल्ली पोलिसांनी केली आहे.
सध्या या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:18 वाजता अग्निशमन विभागाला एक फोन आला. फोन करणाऱ्याने महिपालपूर येथील रेडिसन हॉटेलजवळ मोठा स्फोट झाल्याची माहिती दिली. यानंतर अग्निशमन विभागाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. तपासात असे दिसून आले की मोठा आवाज स्फोटाचा नव्हता. पोलिसांनी सांगितले की बसचा टायर फुटला होता, ज्यामुळे मोठा आवाज झाला. लोकांनी चुकून स्फोट समजून फोन केला.
#BREAKING An explosion was reportedly heard near the Radisson Hotel in Mahipalpur, Delhi. According to the fire brigade, they received the call at 9:18 AM and dispatched three fire engines. Currently, Delhi Police have verified the area and confirmed that nothing suspicious was… pic.twitter.com/gL4HjmFQt3
— IANS (@ians_india) November 13, 2025
तर दुसरीकडे राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.स्फोट झालेल्या आय20 कारमध्ये सापडलेला मृतदेह दहशतवादी उमरचा असल्याची पृष्टी डीएनए चाचणीद्वारे करण्यात आली आहे. तपास यंत्रांनी डीएनए चाचणीमधून उमरच्या मृतदेहाची ओळख पटवली. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
एनआयएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, डॉ. उमरने (Dr. Umar) पांढऱ्या रंगाची हुंडई आय20 कार (i20 car) खरेदी केली होती आणि स्फोटाच्या वेळी तो कारमध्ये उपस्थित होता. तो फरीदाबादमध्ये अटक केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा सदस्य देखील होता. पुलवामामधील सांबुरा गावातील रहिवासी उमरच्या आई आणि भावाचे डीएनए (DNA Test) नमुने घेण्यात आले होते आणि कारमध्ये सापडलेल्या अवशेषांशी जुळले तेव्हा ते 100% जुळले. मृताचे दात, हाडे आणि इतर अवशेष आई आणि भावाच्या नमुन्यांशी जुळवण्यात आले.
दबावाखाली हल्ला
तपास यंत्रणांच्या मते, पोलिसांच्या दबावाखाली जम्मू-काश्मीर आणि फरिदाबादमध्ये दहशतवादी मॉड्यूल उघड केले होते आणि दहशतवाद्यांना शोधण्यासाठी छापेमारी सुरू होती. दबावाखाली उमर आत्मघातकी हल्लेखोर बनला आणि लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बमध्ये स्वतःला उडवून दिले. उमरच्या कुटुंबाला माहित होते की तो कट्टरपंथी बनला आहे आणि चुकीच्या मार्गावर आहे, परंतु चौकशीदरम्यान त्यांनी हे उघड केले नाही. छाप्यामुळे घाबरलेल्या उमरने घाबरून त्याच्या कारसह स्वतःला उडवून दिले. मार्च 2022 मध्ये उमर अंकारा येथे गेला होता, जिथे त्याचे ब्रेनवॉश करून कट्टरपंथी बनवण्यात आले होते, असे उघड झाले आहे.
