निर्बीजीकरणानंतरही परिस्थिती पहिल्यासारखीच
गेल्या काही वर्षांत शहरातील विविध भागांत बालक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना श्वानांचा त्रास झाल्याच्या घटना सतत नोंदल्या गेल्या आहेत. एका बाजूला महापालिकेकडून हजारो श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण केल्याचे सांगितले जाते; दुसरीकडे रस्त्यांवरील टोळकी आणि श्वानदंशाचे प्रकार कायम आहेत. त्यामुळे नसबंदी नेमकी किती झाली, यापेक्षा तिचा परिणाम किती झाला, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरत आहे.
ग्लॅमर आणि एलिगन्सचा परफेक्ट मेळ! जॅकलिन फर्नांडिसचे 8 आयकॉनिक फॅशन मोमेंट्स
भटक्या श्वानांच्या हल्ल्यांची मालिका
भटक्या श्वानांचे हल्ले शहरासाठी नवे नाहीत. 2025 मध्येच तीन महिन्यांत 8 हजार 335 नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची नोंद झाली होती. श्वानांच्या हल्ल्यापासून बचाव करताना वाहनचालकांचे अपघात होण्याच्या घटनाही वाढत असल्याचे त्या वेळी समोर आले होते. महापालिकेने नेहरूनगर येथील श्वान नसबंदी केंद्रातील पिंजरे वाढविणे, मनुष्यबळ वाढविणे आणि नसबंदीची संख्या वाढविण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. मात्र परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. 2025 मधील पहिल्या सात महिन्यांत 20 हजार 664 नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची नोंद झाली होती. मागील दहा वर्षांचा आकडा 1 लाख 70 हजारांहून अधिक असल्याचेही समोर आले.
आंदोलनातील विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचा हिशेब द्या; राहुल गांधींचा अमित शाहांवर थेट निशाणा
महापालिका सभागृहातही प्रश्न गाजला
जानेवारी 2026 मध्ये पिंपळे गुरवमध्ये विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भटक्या श्वानांच्या उपद्रवाचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये हा प्रश्न महापालिका सभागृहातही गाजला. आठ महिन्यांत 20 हजारांहून अधिक नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची आकडेवारी सभागृहात मांडण्यात आली. वाकड, रावेत, किवळे, मामुर्डी, पिंपरी गाव, भुजबळवस्ती आदी भागांतील तक्रारींचाही उल्लेख करण्यात आला होता.
श्वानदंशाची आकडेवारी
– 2025 मध्ये तीन महिन्यांतील श्वानदंश – 8,335
– 2025 मध्ये सात महिन्यांतील श्वानदंश – 20,664
– मागील दहा वर्षांतील श्वानदंश – 1.70 लाखांहून अधिक
– पाच वर्षांत केलेले निर्बीजीकरण – 44,524
– सध्या प्रस्तावित श्वान निवारा क्षमता- 5,000
– प्रस्तावित श्वान पिंजरे – 660
सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
नागरिकांचे प्रशासनाला सवाल
– हजारो श्वानांचे निर्बीजीकरण झाले, मग श्वानांच्या झुंडी कमी का होत नाहीत?
– श्वानदंशाचे प्रकार सतत वाढत असतील तर निर्बीजीकरणाचा परिणाम नेमका कुठे दिसतो?
– धोकादायक श्वानांची स्वतंत्र नोंद ठेवली जाते का?
– संवेदनशील भाग निश्चित करून तेथे नियमित पाहणी होते का?
– रस्त्यावर खाद्य मिळत असल्याने श्वानांच्या झुंडी जमा होत असतील तर कचरा व्यवस्थापनावर कारवाई का होत नाही?
– प्रस्तावित पाच हजार क्षमतेच्या श्वान निवाऱ्याचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार?
– प्रशासनाला जाग कधी येणार?
मुख्य आरोपी मातीत गाडला गेला असला तरी त्याला शोधा; धीरज परदेशी प्रकरणात गोपीचंद पडळकरांची एंट्री !
विशेष पथक तैनात करण्याची मागणी
चिखली-म्हेत्रेवस्ती परिसरातील हिंसक भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथक तैनात करावे. संबंधित परिसरात निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबवून पुढील तीन दिवसांत दैनंदिन अहवाल सादर करावा. 24 तासांत ठोस उपाययोजना न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक यश साने यांनी दिला आहे.
पालिका प्रशासनाची भूमिका
पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण सुरू आहे. त्यासाठी संवेदनशील भाग ओळखून टप्प्याटप्प्याने विशेष पथके नेमण्यात आली आहेत. भटक्या श्वानांचे स्थानांतरण कायद्यानुसार करता येत नसल्याने निर्बीजीकरण आणि लसीकरण हाच प्रमुख उपाय आहे. मार्च महिन्यात रेबीज प्रतिबंधक लसीकरण, जनजागृती आणि सर्वेक्षण मोहीम राबविली. त्या वेळी 9 हजार 399 श्वानांचे लसीकरण झाले होते.
अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
‘संडे १९९६’ कोकणाच्या निसर्गरम्य भूतकाळ-वर्तमानातील सीमारेषा धूसर करणारी रहस्य कथा
