ताथवडे सिटी सर्व्हेसाठी राहुल कलाटेंची मागणी; महसूलमंत्र्यांचे मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन
Chandrashekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताथवडे सिटी सर्व्हेची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
Chandrashekhar Bawankule to expedite the Tathawade city survey : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ताथवडे गावठाण परिसरात सिटी सर्व्हेअभावी मालमत्तेची मोजणी, बांधकाम परवानगी तसेच इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ताथवडे परिसरातील सिटी सर्व्हेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत नगरसेवक राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत सिटी सर्व्हेची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले असून, जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांच्याकडे शेरा मारून ते निवेदन दिले असून, लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश वजा सूचना दिल्या आहेत.
वरिष्ठांचा विरोध, पण पार्थ पवार ठाम; झिशान सिद्दिकींना मुंबई अध्यक्षपद मिळणार?
मौजे ताथवडे, ता. मुळशी, जि. पुणे येथील गावठाण परिसराचा सिटी सर्व्हे अद्याप झालेला नाही. नगरसेवक राहुल कलाटे यांनी यासाठी 2020 सालापासून संबंधित विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही या महत्त्वपूर्ण प्रश्नावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. ताथवडेतील नागरिकांच्या मालमत्ता सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात येतात. मात्र सिटी सर्व्हे अभावी ताथवडे गावठाण परिसरात मालमत्तेची मोजणी, बांधकाम परवानगी तसेच इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
‘तर तुम्ही नालायक गृहमंत्री आहात’; अमित शहांवर पृथ्वीराज चव्हाणांची घणाघाती टीका
एकीकडे अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते, तर दुसरीकडे सिटी सर्व्हेच झालेला नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. परिणामी ताथवडे गावठाण परिसराच्या नियोजित आणि कायदेशीर विकासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ताथवडे गावठाण परिसराचा सिटी सर्व्हे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या मालमत्तांशी संबंधित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 13 ऑगस्ट रोजी पुण्यात प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासह ताथवडे गावातील उद्योजक गणेश फेंगसे, उद्योजक काळूराम नवले आणि रविंद्र गोफणे उपस्थित होते.
1 सप्टेंबरला ओबीसी मुंबईत! हे आमचं शेवटचं आंदोलन म्हणत हाकेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
ताथवडे गावठाण परिसराचा सिटी सर्व्हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सन 2020 पासून सातत्याने पत्रव्यवहार करूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नव्हता. या परिसराचा समावेश महापालिका क्षेत्रात झालेला आहे आणि एका बाजूला अनधिकृत बांधकाम केल्यास कार्यवाही व दुसऱ्या बाजूला सिटी सर्व्हे नसल्यामुळे कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण करता येत नसल्यामुळे गावठाण परिसराचा विकास होत नाही. त्यामुळे या प्रश्नासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आदरणीय मंत्री महोदयांनी यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी भावना पिंपरी चिंचवड महापालिका नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली आहे.