महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार! कोकणासह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, परतीचा पाऊसही निराश करणार?

मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.

Untitled Design   2026 10 09T123506.006

Untitled Design 2026 10 09T123506.006

Heat intensity to rise in Maharashtra : महाराष्ट्रात यंदा मान्सूनच्या हंगामात पावसाची तूट राहिल्याने अनेक भागांत पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीची चिंता वाढली आहे. त्यातच पार्टीच्या पावसाने देखील अपेक्षित हजेरी न लावल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात उष्ण, दमट आणि कोरड्या हवामानाचा अनुभव येत आहे. 9 ऑक्टोबर रोजी कोकणासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाच्या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे.

कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील दोन दिवस हवामानाचा परिणाम जाणवू शकतो. मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दुपारच्या वेळी कडक ऊन आणि सायंकाळच्या सुमारास गडगडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर रोजीही कोकणातील काही भागांत अशीच स्थिती राहू शकते.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी पावसाचा विशेष इशारा नसला, तरी उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास जाणवू शकतो. काही भागांत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात.

‘देवानंच त्याचा जीव घेतलाय’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताचं धक्कादायक वक्तव्य

मात्र, संपूर्ण विभागात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. या भागांत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. पावसाचा विशेष इशारा नसल्याने या भागांत पावसाची उघडीप कायम राहू शकते.

त्याचवेळी तापमानात वाढ झाल्याने उष्णतेचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतही पावसाचा विशेष अलर्ट नसून, हवामान प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. काही भागांत दमट वातावरण जाणवू शकते. या विभागातील कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेचा भारतीय IT कंपन्यांना मोठा दणका! 6 कंपन्यांवर कारवाई, भारतीयांचं ग्रीन कार्ड अडकणार?

एकूणच, राज्यातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता असून, कोकणातील काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात; मात्र राज्यभर जोरदार पावसाचे संकेत दिसत नाहीत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणे टाळावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी. हवामानातील बदल लक्षात घेता भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

Exit mobile version