ICC Cricket Schedule 2028-2035 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) 2028 ते 2035 या कालावधीतील प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत आगामी जागतिक स्पर्धांच्या आयोजनासह पात्रता फेरीचे स्वरूपही निश्चित करण्यात आले. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक, 2028 चे पुरुष आणि महिला टी-20 विश्वचषक यांसाठी पात्रता प्रक्रियेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पूर्ण सदस्यांसह सहयोगी देशांनाही जागतिक स्पर्धेत संधी मिळण्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे.
आयसीसीच्या मंजूर वेळापत्रकानुसार, 2029 ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात 9 ते 28 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. 2031 चा एकदिवसीय विश्वचषक भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. इंग्लंडमध्ये 2029 आणि 2031 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढती खेळवल्या जातील. 2030 चा पुरुष टी-20 विश्वचषक इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये होणार असून 2035 चा एकदिवसीय विश्वचषक 2 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्याचे नियोजन आहे.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धेत 10 संघ सहभागी होतील. या स्पर्धेतून 4 संघांना विश्वचषकात प्रवेश मिळणार आहे. त्यापैकी विजेता संघ थेट मुख्य गटात स्थान मिळवेल, तर उर्वरित 3 पात्र संघांना सुपर सिरीज खेळावी लागेल. 2028 च्या पुरुष टी-20 विश्वचषकासाठी जागतिक पात्रता स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील आणि त्यातून 8 संघांना थेट प्रवेश मिळेल. महिला टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड आणि यजमान पाकिस्तान या संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. उर्वरित 2 जागांसाठी 10 संघांची पात्रता स्पर्धा होणार आहे.
दरम्यान, लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्याने आयसीसीने अंतिम पात्रता स्पर्धांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. पुरुषांची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा अमेरिकेत 5 ते 13 फेब्रुवारी 2028 दरम्यान, तर महिलांची स्पर्धा बांगलादेशमध्ये 26 फेब्रुवारी ते 5 मार्चदरम्यान होणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी 8 संघ सहभागी होतील. अंतिम सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला ऑलिम्पिकमधील शेवटचे उपलब्ध स्थान मिळणार आहे.
<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>A long-term calendar takes shape as the ICC announces major men’s tournament windows through 2035. More ➡️ https://t.co/MQ3C04Rp1t https://t.co/ZwsOK1eDqt</p>— ICC (@ICC) <a href=”https://x.com/ICC/status/2121958537396150705?ref_src=twsrc%5Etfw”>November 15, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.x.com/widgets.js” charset=”utf-8″></script>
