मुंबईमध्ये 20 वर्षांच्या दिव्यांग मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची (Rape) धक्कादायक घटना घडली. अत्याचारानंतर ही मुलगी गरोदर झाली, त्यामुळे मुंबई पोलिसांनी 17 संशयीत आरोपींची डीएनए टेस्ट केली. डीएनए टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण डीएनए टेस्टचे रिपोर्ट मुलीच्या बापासोबत जुळल्याची नात्याला काळीमा फासणारे अत्यंत वाईट सत्य समोर आलं आहे, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
मुंबईतील कफ परेड परिसरातील एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या प्रकरणात, पोलिसांनी यापूर्वी दुसऱ्या पुरूषाला आणि 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले होते. या दोघांनाही महिलेने ओळखले होते. सप्टेंबर 2025 मध्ये महिलेने तिच्या आजीला पोटात दुखत असल्याची तक्रार केली. हाताच्या हावभावांचा वापर करून तिने सांगितले की तिला तिच्या पोटात कीटक रेंगाळत आहेत, असे वाटत होते. त्यानंतर तिला शहरातील कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बीड जिल्ह्यात संतापजनक घटना! अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या वृद्धाचा अत्याचार
वैद्यकीय तपासणीत महिला पाच महिन्याची गरोदर असल्याचे उघड झाले. रुग्णालय प्रशासनाने ताबडतोब पोलिसांना कळवले. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की सुरुवातीला त्यांना संवादात अडचण येत होती कारण पीडितेला बोलता येत नव्हतं, त्यानंतर पोलीस वडिलांशी बोलले, ज्यांनी लैंगिक शोषणाबद्दलचे प्रश्न फेटाळून लावले आणि मुलगी गर्भवती कशी झाली हे ते स्पष्ट करू शकले नाहीत. तसंच त्यांनी तक्रार दाखल करण्यासही नकार दिला.
पुढे समुपदेशन केल्यानंतर महिलेने तक्रार दाखल करण्यास सहमती दर्शविली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. पोलिसांना वडिलांवरही संशय आल्यामुळे त्यांचीही डीएनए टेस्ट करण्यात आली. डीएनए टेस्टमध्ये वडिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पोलिसांनी वडिलांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान महिलेवर अत्याचार केले गेले.
