Lalbaugcha Raja Visarjan Mirvanuk 2026: दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज मुंबईसह राज्यभरातील गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या विसर्जनाचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. निरोपाच्या आरतीनंतर बाप्पाची राजेशाही विसर्जन मिरवणूक सुरू होणार असून, त्यानंतर गणरायाला गिरगाव चौपाटीवरून अरबी समुद्रात विसर्जित करण्यात येणार आहे.
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत AI आणि व्यापारावर चर्चा; अमेरिका-चीन जवळ येतायत, भारतासाठी नवं आव्हान?
लालबागच्या राजाची पूजा आणि मिरवणुकीचं वेळापत्रक
लालबागच्या राजाची सकाळी 10 वाजता विधिवत पूजा करण्यात येईल. पूजेनंतर दुपारी 12 वाजता लालबागच्या राजाची मुख्य राजेशाही विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होईल. दुपारी 1 वाजता बाप्पाची मूर्ती मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचणार आहे.
यावेळी मुंबई पोलिसांना विशेष सलामी देण्यात येणार आहे. ‘माणूस उभा आहे वर्दीतला… म्हणून उत्सव साजरा होतोय गर्दीतला…’ या भावनेतून पोलिसांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे.
गिरगाव चौपाटीवर प्रशासनाची विशेष तयारी
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून गिरगाव चौपाटीसह मिरवणुकीच्या मार्गावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणखी अडचणीत; थेट कोल्हापूर खंडपीठात याचिका
असा असेल लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणूक मार्ग
लालबाग मार्केटमधून मिरवणुकीला सुरुवात होऊन ती मुख्य प्रवेशद्वार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारतमाता सिनेमा, लालबाग पोलिस चौकी आणि पुन्हा लालबागच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाईल.
यानंतर श्रॉफ बिल्डिंग येथे पुष्पवृष्टी, चिंचपोकळी ब्रिज, भायखळा रेल्वे स्टेशन, हिंदुस्तान मस्जिद, मुंबई अग्निशमन दल मुख्यालय, खडा पारसी, दोन टाकी, कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधव बाग, व्ही. पी. रोड, प्रार्थना समाज आणि गिरगाव चौपाटी सिग्नल असा पुढील मार्ग असेल.
एसआयआर प्रकरणानंतर मोठी राजकीय घडामोड, ज्ञानेश कुमारांविरोधात ‘महाभियोग’ प्रस्तावाची तयारी
मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयाजवळ अग्निशमन दलाकडून सायरन वाजवून लालबागच्या राजाला सलामी दिली जाणार आहे. तसेच दोन टाकी परिसरात मुस्लिम बांधवांकडून बाप्पाला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
26 सप्टेंबरला अरबी समुद्रात विसर्जन
मिरवणूक गिरगाव चौपाटीवरील मुंबई महापालिकेच्या स्वागत कक्षाजवळ पोहोचल्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जन तराफ्यावर नेण्यात येईल. 26 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता या तराफ्यावरून लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे.
