मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणखी अडचणीत; थेट कोल्हापूर खंडपीठात याचिका
Gyanesh Kumar: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात रत्नागिरीचे प्रथमेश गावणकर यांनी ॲड.असीम सरोदे यांच्या मदतीने ही याचिका दाखल झालीय.
Chief Election Commissioner Gyanesh Kumar : एसआयआर, मतदान यंत्रे, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणे इत्यादी मुद्यांवरून गेल्या काही वर्षांपासून भारत निवडणूक आयोग वादात अडकला आहे. आता तर भारत निवडणूक आयोगात (ECI) फूट पडलीय. आपला विरोध डावलून किंवा मत विचारात न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निर्णय घेतल्याची तक्रारच तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील दोन सदस्यांनी केलीय. सदस्य सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केलीय. त्यामुळे देशात गदारोळ उडाला असून, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केलीय. तर आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधाच याचिका दाखल करण्यात आलीय.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात रत्नागिरीचे प्रथमेश गावणकर यांनी ॲड.असीम सरोदे यांच्या मदतीने ही याचिका दाखल झालीय. 14 निर्णयांवर दोन निवडणूक आयुक्तांचे आक्षेप असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याने कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील SIR प्रक्रिया थांबविण्यासह मतदार यादीतून रद्द करण्यात आलेल्या मतदारांची नावे पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्यात आलीय.
एसआयआर प्रकरणानंतर मोठी राजकीय घडामोड, ज्ञानेश कुमारांविरोधात ‘महाभियोग’ प्रस्तावाची तयारी
14 निर्णयांबाबत दोन निवडणूक आयुक्तांनी कथितरित्या उपस्थित केलेल्या आक्षेपांचा योग्य प्रकारे विचार करण्यात आला नाही. तसेच, या निर्णयप्रक्रियेत निर्धारित कायदेशीर आणि प्रक्रियात्मक नियमांचे पूर्णपणे पालन झाले नसल्याचा दावाही करण्यात आलाय. राज्यातील सुरू असलेल्या (Special Intensive Revision) विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेबाबत योग्य निर्देश देण्यात यावेत. मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे आवश्यक पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत. कथित प्रक्रियात्मक अनियमितता तसेच निर्णयप्रक्रियेची कायदेशीरता याबाबत न्यायालयीन तपासणी करण्यात यावी मात्र, याचिकेत करण्यात आलेले आरोप आणि करण्यात आलेल्या मागण्यांवर अंतिम निर्णय घेणे हे उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे, अशी याचिकेत म्हटले आहे.
ज्ञानेशकुमारांकडून संविधानाचा विश्वासघात-असिम सरोदे
ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून संविधानाचा विश्वासघात केला आहे. लोकशाहीविरोधातील एक व्हाईट कॉलर क्राईम म्हणून निवडणूक चोरीचा प्रक आता भारतभर चर्चेचा मुद्दे ठरला आहे. यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी आता UCC म्हणजे समान नागरी कायदा आणण्याची घाई सुरु झालेली असे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.